राज्यातील प्रकल्प ‘ट्रॅकवर’
By admin | Published: February 2, 2017 12:06 AM2017-02-02T00:06:35+5:302017-02-02T00:06:35+5:30
राज्यातील रेल्वे प्रकल्प आता ‘ट्रॅकवर’ येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या मंजुर तसेच सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी ५ हजार ९५८ कोटी रुपयांच्या खर्चाला रेल्वे अर्थसंकल्पातून
मुंबई : राज्यातील रेल्वे प्रकल्प आता ‘ट्रॅकवर’ येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या मंजुर तसेच सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी ५ हजार ९५८ कोटी रुपयांच्या खर्चाला रेल्वे अर्थसंकल्पातून मंजुरी देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात भरीव तरतुद महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी करण्यात आल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांकडून करण्यात आला आहे.
राज्यातील रेल्वे प्रकल्पांचा विकास, प्रकल्पांना गती मिळावी, त्याची अंमलबजावणी आणि व्यवहार्यता तपासणे, प्रकल्प क्षमतेत वाढ करणे, रेल्वे प्रकल्प दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण व्हावेत आणि भूसंपादन झाल्यानंतर प्रकल्पबाधितांना मदत देतानाच त्यांचे पुनर्वसन त्वरित व्हावे यासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा या नावाने महामंडळ स्थापन करण्यास नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे प्रकल्पांना राज्य शासनाकडून गती दिली जात असतानाच केंद्राकडूनही राज्यातील प्रकल्पांसाठी आर्थिक बळ दिले जात आहे.
बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांच्या कामांसाठी ५ हजार ९५८ कोटी रुपयांचा खर्चाला मंजुरी देण्यात आली.
महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला जात असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल यांनी सांगितले. २00९-१४ पर्यंत १ हजार १७१ कोटी रुपये देण्यात आले होते. २0१४-१६ मध्ये प्रत्येक वर्षी ३ हजार ५८६ कोटी रुपये मंजुर झाले. दोन वर्षात चांगली वाढ देतानाच २00९ पासून पाहिल्यास जवळपास ४0८ टक्के वाढीव मदत देण्यात आल्याचे सांगितले. राज्यातील प्रकल्पांबरोबरच यात मुंबईतीलही काही प्रकल्प आहे.