श्रेष्ठत्वाची उतरण झुगारुन द्या, मराठा अस्मिता परिषदेत आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 06:36 PM2017-09-27T18:36:41+5:302017-09-27T18:37:18+5:30

धार्मिक विधी, लग्न समारंभ, पित्र अशा कर्मकांडाला ब्राम्हण्यवादाचा पगडा असलेल्या पुरोहितांचा वापर करु नका. स्त्रियांना समानतेची वागणूक द्या. आपल्या घरापासून याची सुरुवात करा, असा आवाज मराठा अस्मिता परिषदेत बुधवारी घुमला. 

Prolong the sloping of superiority, the voice in the Maratha Asmita Conference | श्रेष्ठत्वाची उतरण झुगारुन द्या, मराठा अस्मिता परिषदेत आवाज

श्रेष्ठत्वाची उतरण झुगारुन द्या, मराठा अस्मिता परिषदेत आवाज

Next

पुणे -  धार्मिक विधी, लग्न समारंभ, पित्र अशा कर्मकांडाला ब्राम्हण्यवादाचा पगडा असलेल्या पुरोहितांचा वापर करु नका. स्त्रियांना समानतेची वागणूक द्या. राजकीय छत्राखाली पोसले जाणारी जातीयता फेकून द्या. मराठा जातीअंतर्गत असलेली राजे, जाहगिरदार, इनामदार, देशमुख अशी श्रेष्ठत्वाची उतरण झुगारुन द्या. आपल्या घरापासून याची सुरुवात करा असा आवाज मराठा अस्मिता परिषदेत बुधवारी घुमला. 

सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. भारत पाटणकर, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, टेक्सास गायकवाड, गेल आॅमवेट, निर्मला यादव, राहुल पोकळे, अभिषेक देशपांडे, अश्विनी सातव-भिडे, आत्माराम शास्त्री जाधव या वेळी उपस्थित होते. 

अ‍ॅड. खेडेकर म्हणाले, मनूस्मृती कायदे हे केवळ कागदावरच बंद आहेत. प्रत्यक्षात अपण समाजजीवनात त्याचा वापर करीत आहोत. त्यामुळे काही गोष्टी आपण स्वत:पासून पाळल्या पाहिजेत. या पुढे ब्राम्हण पुरोहितांशी धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध ठेवणार नाही याची प्रत्येकाने प्रतिज्ञा करावी. त्याच बरोबर प्रत्येक स्त्रीला मी मान देईन, तिचा आदर करेन अशी भूमिका ठेवली पाहीजे. मराठ्यांमध्ये देखील आपल्या कुळांचा अभिमान बाळगला जातो. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होत नाही. हे देखील आपण टाळले पाहिजे. मराठ्यांनी इतर उपाधी न लावता कुळ नाम लावावे. 

आत्ताचे सरकार तुम्हाला आंदोलन करा असेच सांगेल. मात्र, आंदोलनात दलित, मागासवर्गीय असे मुद्दे घुसडून त्याला कसे वेगळे वळण देण्यात आले हे आपण मराठा आंदोलनाच्या निमित्ताने अनुभवले आहे. त्यामुळे आता तरी एक होऊन कामाला लागा. युवकांनी देखील पुढाºयांच्या मागे धावू नये. खरेतर आम्हाला कोणते आरक्षण नको आहे. राजकीय तर मुळीच नाही. मात्र, केजी टू पीजी शिक्षण मोफत द्यावे, अशी मागणी असल्याचे न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी सांगितले. 

स्त्रियांना आजही शूद्राची वागणूक दिली जात आहे. आज काही प्रमाणात स्वातंत्र्य असले, तरी बरोबरीची वागणूक तिला मिळत नाही. तिला कमावते होण्याची मुभा असली, तरी ठरवते व्हायचे स्वातंत्र्य अजूनही नाही. या सामाजिक सोवळ््यातून आपण बाहेर येण्याची गरज, सातव-डोके यांनी व्यक्त केली. 

आजही नावापुढे आम्ही राजे. आम्ही या कुळाचे असे सांगणारे आहेत. तसेच, कोणत्या घराण्यात विवाह होतात, याची त्यांची यादी देखील तयार असते. जर, तुम्ही क्षत्रिय मानत असाल, तर ब्राम्हण्य देखील ओघाने येतेच, याचे भान ठेवण्याचा सल्ला पाटणकर यांनी दिला. 

Web Title: Prolong the sloping of superiority, the voice in the Maratha Asmita Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे