केंद्रीय पथकाचा दौरा लांबणीवर
By admin | Published: December 6, 2014 02:05 AM2014-12-06T02:05:07+5:302014-12-06T02:05:07+5:30
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दोन दिवसांत महाराष्ट्रात येणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे
औरंगाबाद : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दोन दिवसांत महाराष्ट्रात येणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दिल्लीत जाहीर केले; परंतु प्रत्यक्षात केंद्राचे पथक दहा दिवसांनंतर मराठवाड्यात दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे पथक १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात आधी औरंगाबादला येईल. यातील काही अधिकारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याची पाहणी करणार आहेत, तर उर्वरित अधिकारी नागपूर, बुलडाणा आणि धुळे जिल्ह्याकडे जाणार आहेत.
अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील बहुतेक प्रकल्प पावसाळ्यानंतरही रिकामेच राहिले आहेत, तसेच ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके नष्ट झाली आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे नुकताच अहवाल पाठविला. त्यानुसार केंद्राचे पथक दुष्काळग्रस्त भागाला भेट देणार आहे. (प्रतिनिधी)