हाजी अली दर्ग्यातील 'महिला प्रवेश' लांबणीवर
By Admin | Published: October 7, 2016 03:47 PM2016-10-07T15:47:09+5:302016-10-07T15:47:49+5:30
हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने वाढवली आहे. यामुळे हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश लांबवणीवर पडला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.7 - हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने वाढवली आहे. यामुळे हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश लांबवणीवर पडला आहे. हाजी अली ट्रस्टने आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टाकडे दोन आठवड्यांची वेळ मागितली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने हाजी अली ट्रस्टला पुरोगामी भूमिका मांडण्यासाठी सांगितले आहे. तसंच दर्ग्यामध्ये पुरुषांना प्रवेश, महिलांना प्रवेश नाही, ही बाब अडचण निर्माण करणारी असल्याचे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आणखी बातम्या
हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन मुंबई हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. सध्या हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
SC extends stay on entry of women in Haji Ali after board says it will come out with progressive stand in 2 weeks,next hearing on Oct 17
— ANI (@ANI_news) October 7, 2016
SC said 'troubles are created when at a place, men are allowed & women are not' Court asked Haji Ali trust to come up with progressive stand
— ANI (@ANI_news) October 7, 2016