बेकरी पदार्थांवरील ‘व्हॅट’ कमी करण्याचे आश्वासन
By Admin | Published: March 20, 2016 02:26 AM2016-03-20T02:26:44+5:302016-03-20T02:26:44+5:30
बेकरी पदार्थांसाठी लागणाऱ्या मैद्याला ५ टक्के, तर यापासून तयार होणाऱ्या पदार्थांसाठी १२ टक्के व्हॅट आहे. हा फरक का? यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा करून व्हॅट कमी करण्यासाठी प्रयत्नशील
कोल्हापूर : बेकरी पदार्थांसाठी लागणाऱ्या मैद्याला ५ टक्के, तर यापासून तयार होणाऱ्या पदार्थांसाठी १२ टक्के व्हॅट आहे. हा फरक का? यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा करून व्हॅट कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे दिली. राज्य सरकार या व्यवसायाच्या मागे उभे राहील, असा विश्वासही त्यांनी दिला.
लक्ष्मीपुरी येथील बेकर्स भवन परिसरात आयोजित कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार हाफीज धत्तुरे, उपस्थित होते. (प्रतिनिधी)