रविवार ठरला प्रचारवार

By admin | Published: October 13, 2014 05:47 AM2014-10-13T05:47:57+5:302014-10-13T05:47:57+5:30

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असल्यामुळे सुटीचा रविवार अनेकांनी प्रचारार्थ लावला

Promoted to be held on Sunday | रविवार ठरला प्रचारवार

रविवार ठरला प्रचारवार

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असल्यामुळे सुटीचा रविवार अनेकांनी प्रचारार्थ लावला. आधीच ‘आॅक्टोबर हिट’, त्यात नेत्यांच्या धडाडणाऱ्या तोफा, उमेदवारांच्या पदयात्रा आणि कार्यकर्त्यांच्या रॅलींमुळे राज्यातील वातावरण अधिक तापले.
निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी (१३ आॅक्टोबर) सायंकाळी ५ वाजता होत आहे. त्यामुळे रविवारी प्रचार शिगेला पोहोचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूर, तुळजापूर, भोकर, ठाणे आणि बोरीवली येथे सभा घेतल्या, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बुलडाणा आणि रामटेक येथे सभा झाल्या. उभय नेत्यांच्या सभांनी प्रचार टिपेला पोहोचला. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण आणि मुंबईत सभा घेतल्या, तर मुंबईतील मलबार हिलच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.
युतीच्या फुटीचा फटका बसणार  भाजपा-सेना युती तुटल्याने शहरातील मतदारसंघात मतांवर परिणाम होईल, त्याचा फटका बसेल, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Promoted to be held on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.