सोशल मीडियावर आता प्रचाराची बंधने

By admin | Published: September 13, 2014 11:48 PM2014-09-13T23:48:34+5:302014-09-13T23:48:34+5:30

सोशल मीडियावरून होणा:या प्रचाराचा सध्या सर्वाधिक प्रभाव तरुणाईवर होत असून, विधानसभा निवडणुकीत हा खर्चही उमेदवाराच्या हिशेबात धरण्यात येणार आह़े

Promotion on Social Media Now | सोशल मीडियावर आता प्रचाराची बंधने

सोशल मीडियावर आता प्रचाराची बंधने

Next
पुणो : सोशल मीडियावरून होणा:या प्रचाराचा सध्या सर्वाधिक प्रभाव तरुणाईवर होत असून, विधानसभा निवडणुकीत हा खर्चही उमेदवाराच्या हिशेबात धरण्यात येणार आह़े सध्या फेसबुक व्हॉट्स अॅपच्या जमान्यात प्रचाराचा धुरळा वॉलपेपरवर उडताना दिसेल खरा; पण याचा वापर किती करावा, याविषयीही निवडणूक आयोगाने मर्यादा आणण्याचे ठरविले आहे. निवडणुकीच्या खर्चात सोशल मीडियाच्या वापराविषयीच्या खर्चाचेही हिशेब मांडावे लागणार आहेत.  
 
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज (शनिवार) सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आचारसंहितेविषयी माहिती दिली़ विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, उपजिल्हा  निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकर- गोकुळे आदी अधिकारी उपस्थित होत़े 
राव म्हणाले, निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरून होणा:या प्रचाराचाही समावेश निवडणूक खर्चात करण्याचे आदेश दिले आहेत़ प्रिंट मीडियाप्रमाणोच त्यावर बंधने राहणार आहेत़ त्यानुसार फेसबुक, व्हॉट्स अॅप व अन्य माध्यमांतून करण्यात येणा:या प्रचार मजकूर आणि साहित्याला मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीकडून पूर्वप्रमाणीकरण करून घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केल़े यावर व्हॉट्स अॅप, फेसबुक मोफत असल्याचा मुद्दा उपस्थितांनी काढला़  मात्र, त्यासाठी लागणारे इंटरनेट कनेक्शन तर मोफत नाही, असे सांगून हा खर्च उमेदवारांना हिशेबात दाखवावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितल़े 
राजकीय पक्षांना त्यांच्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभेसाठी आगाऊ परवानगी घ्यावी़ सर्व प्रकारच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आह़े प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आह़े परवानगी देताना कोणताही भेदभाव होऊ नये. प्रथम येणा:यास प्रथम परवानगी देण्याच्या सूचना सर्व निवडणूक अधिका:यांना दिल्या आहेत़  (प्रतिनिधी) 

 

Web Title: Promotion on Social Media Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.