सशक्त, स्वाभिमानी भारत उभारणीचे वचन
By admin | Published: May 18, 2014 12:42 AM2014-05-18T00:42:34+5:302014-05-18T00:42:34+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशक्त, स्वाभिमानी व स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी निष्ठेने झटण्याचे अभिवचन भारतीय जनता पार्टीने शनिवारी दिले.
Next
>नवी दिल्ली : देशवासीयांनी दिलेल्या अभूतपूर्व जनादेशाचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशक्त, स्वाभिमानी व स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी निष्ठेने झटण्याचे अभिवचन भारतीय जनता पार्टीने शनिवारी दिले.
16 व्या लोकसभेसाठी उत्साहाने मतदान करून देशाच्या सत्तेच्या चाव्या मोठय़ा विश्वासाने सोपविल्याबद्दल देशातील तमाम मतदारांचे, पक्ष कार्यकत्र्याचे, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे आभार मानणारा ठराव भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी या जनादेशाचे आगळेपण विषद करताना नमूद केले की, स्वातंत्र्योत्तर भारतात काँग्रेसहूनही अधिक राजकीय उंची गाठण्याचे श्रेय मतदारांनी भाजपाला प्राप्त करून दिले आहे.
राजनाथ सिंग यांनी सांगितले की, नव्या लोकसभेतील भाजपा संसदीय पक्षाचा नेता कोण असेल हे ठरलेले असले, तरी त्या पदावर मोदी यांची निवड करण्यासाठी संसदीय पक्षाची बैठक 2क् मे रोजी होईल. शपथविधीची तारीख अद्याप ठरलेली नाही. मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी औपचारिकपणो निवड झाल्यावर रालोआच्या मित्रंकडून त्यास संमती घेतली जाईल व त्यानंतर शपथविधीची तारीख ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकोप्याने स्वागत
मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड होण्यापूर्वी व नंतरही पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नाराजीचे सूर काढले होते. मात्र संसदीय मंडळाच्या बैठकीत एकोप्याचे चित्र दिसले. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी भलामोठा पुष्पहार घालून मोदींचे स्वागत केले. मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांचा पाया पडून आशीर्वाद घेतले तर अडवाणींनी मोदींना आलिंगन दिले. सुषमा स्वराज यांनीही व्यक्तिश: पुष्पगुच्छ देऊन मोदींचे अभिष्टचिंतन केले, तर अरुण जेटली व मोदी यांनी परस्परांना मिठाई भरवून घनिष्ट स्नेह प्रकट केला.