तहसीलदारांची पदोन्नती थांबली

By admin | Published: June 19, 2016 12:40 AM2016-06-19T00:40:15+5:302016-06-19T00:40:15+5:30

गेल्या ११ वर्षांपासून सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध न केल्याने राज्यातील १२००हून अधिक तहसीलदारांची पदोन्नती थांबल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दि. १३ जूनला दिले होते. त्या वृत्ताच्या दणक्याने

The promotion of tahsildar stopped | तहसीलदारांची पदोन्नती थांबली

तहसीलदारांची पदोन्नती थांबली

Next

कोल्हापूर : गेल्या ११ वर्षांपासून सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध न केल्याने राज्यातील १२००हून अधिक तहसीलदारांची पदोन्नती
थांबल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दि. १३ जूनला दिले होते. त्या वृत्ताच्या दणक्याने खडबडून जागे झालेल्या राज्य महसूल विभागाने सेवाज्येष्ठता यादीचे काम सुरू केले
याबाबत गुरुवारी (दि. १६) सर्व विभागीय आयुक्तांना लेखी पत्र पाठवून ज्येष्ठता यादी संदर्भातील माहिती लवकरात लवकर सादर करण्याची सूचना केली आहे.
दरवर्षी जानेवारीत कारकून, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, प्रांताधिकारी, नायब तहसीलदारांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध
केली जाते आहे; परंतु राज्य शासनाने राज्यातील तहसीलदारांची ज्येष्ठता यादी सन २००५पासून प्रसिद्धच न केल्याने याचा फटका सुमारे १२०० हून अधिक तहसीलदारांना बसला आहे.
यादी प्रसिद्ध न झाल्याने त्यांची पदोन्नती थांबली आहे. तहसीलदारांची सन २००४ ते २०१५ या कालावधीतील ज्येष्ठता
यादी तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The promotion of tahsildar stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.