प्रचाराचे वादळ शमले

By Admin | Published: October 14, 2014 02:19 AM2014-10-14T02:19:29+5:302014-10-14T02:19:29+5:30

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिनाभर राज्यात घोंघावणारे प्रचाराचे वादळ सोमवारी सायंकाळी शमले. प्रचार फे:या, सभांनी महाराष्ट्र अक्षरश: दुमदुमून गेला.

Promotional Storms Shown | प्रचाराचे वादळ शमले

प्रचाराचे वादळ शमले

googlenewsNext
आता प्रतीक्षा मतदानाची : प्रचार फे:या, सभांनी महाराष्ट्र दुमदुमला
राज्यात झाल्या एकूण 715 सभा
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिनाभर राज्यात घोंघावणारे प्रचाराचे वादळ सोमवारी सायंकाळी शमले. प्रचार फे:या, सभांनी महाराष्ट्र अक्षरश: दुमदुमून गेला. धडाडणा:या मुलुखमैदानी तोफा थंडावल्याने आता मोठय़ा मेहनतीने कमावलेले जनमत मतयंत्रत पोहोचेर्पयत रात्रीतून कुठे दगाफटका होऊ नये, यासाठी हक्काच्या मतपेढय़ांभोवती जागता पहारा ठेवला जात आहे. जाहीर प्रचारावर प्रतिबंध असल्याने व्हॉट्सअॅप, सोशल नेटवर्किग व निरोपानिरोपी अशा खुश्कीच्या मार्गाचा अवलंब होण्याची शक्यता आहे. राज्यात बुधवार, 15 ऑक्टोबरला मतदान होत असून पंचरंगी लढतीत कोण बाजी मारतोय, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना व भाजपा यांच्यातील 25 वर्षाची युती तुटली. पाठोपाठ राष्ट्रवादीनेही काँग्रेसपासून फारकत घेतली. त्यामुळे मुकाबला पंचरंगी बनला. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारासाठी ठाण मांडून बसल्याने मोदी विरुद्ध सर्व पक्ष, असे काहीसे वातावरण पंधरवडाभर दिसले. पालघर व कोकणात सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी प्रचाराची सांगता केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराड मतदारसंघात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत, सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव, मुक्ताईनगर येथे सभा घेतल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या माध्यमातून संदेश देऊ केला. 
 
सोनिया, राहुल गांधींच्या सभांमुळे उत्साह
पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणो, सुशीलकुमार शिंदे या चार माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यात काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळताना महाराष्ट्र ढवळून काढला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चार आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सहा सभा घेत पक्षाच्या प्रचारात जोर आणला. 
 
याशिवाय, मल्लिकाजरुन खरगे, पी.चिदम्बरम, दिग्विजयसिंह, मोहन प्रकाश, सी. पी. जोशी, आनंद शर्मा, अशोक गहलोत, सिद्धरामय्या, कमलनाथ, गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, बालाराम बच्चन, श्युराज वाल्मिकी, अझरुद्दीन, राज बब्बर, नगमा आदी स्टार प्रचारकांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या.
 
भिस्त मोदींवर
शिवसेनेसोबत काडीमोड घेऊन मैदानात उतलेल्या भाजपाच्या प्रचाराची सर्व दारोमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होती. राज्यभरात मोदींनी 27, तर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी 2क् सभा घेतल्या. देशाचे पंतप्रधान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली प्रचारसभा घेत असल्याची टीकाही झाली. गुजराती विरुद्ध मराठी अशी मतविभाणी होऊ नये, म्हणून शहा यांना मुंबईपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली गेली.
 
ठाकरे बंधूंचे ‘एकला चलो रे’..
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोणाशीही 
युती न करता एकहाती प्रचार केला. भाजपाशी असलेली युती तुटल्यामुळे प्रचारारंभी 
उद्धव एकाकी पडल्याचे चित्र होते, मात्र त्यांनीही राज्याच्या कानाकोप:यात प्रचार सभा घेऊन शिवसैनिकांचे स्फुल्लिंग चेतविले. उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही काही ठिकाणी सभा घेतल्या.
 
प्रचारातील 
फटाके
येत्या 1क् दिवसांत तुम्हाला लक्ष्मीदर्शनाचा योग असून, येणारी लक्ष्मी लाथाडू नका.
- नितीन गडकरी, 
केंद्रीय मंत्री 
 
महाराष्ट्र मला गुजरातच्या पुढे न्यायचा आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 
महाराष्ट्रात काय ठेवलं आहे; उद्योगपतींनो, गुजरातमध्ये या.
 - आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री, गुजरात
 
दिल्लीहून अफजलखानाच्या फौजा आल्या.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
 
पेशवाईतील आनंदीबाईने ‘ध’ चा 
‘मा’ केला होता. या आनंदीबाईला ‘म’चा (महाराष्ट्र) गु (गुजरात) करायचा आहे. 
- राज ठाकरे, 
अध्यक्ष, मनसे
 
काँग्रेस 
सोनिया गांधी-4
राहुल गांधी-6
पृथ्वीराज चव्हाण-4क्
अशोक चव्हाण-3क्
नारायण राणो -3क्
सुशीलकुमार शिंदे-25
राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार -55
अजित पवार -8क्
सुनील तटकरे -4क्
छगन भुजबळ  - 4क्
सुप्रिया सुळे    -  4क्
भाजपा 
नरेंद्र मोदी- 27
अमित शहा- 2क्
राजनाथ सिंह- 12
नितीन गडकरी- 1क्4
देवेंद्र फडणवीस- 11क्
विनोद तावडे- 7क्
पंकजा मुंडे- 85
शिवसेना
उद्धव ठाकरे- 5क्
आदित्य ठाकरे- 35
रामदास कदम- 3क्
संजय राऊत- 32
अमोल कोल्हे- 35
मनसे
राज ठाकरे- 37

 

Web Title: Promotional Storms Shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.