वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना बढती आणि बदल्या
By admin | Published: May 13, 2016 02:46 PM2016-05-13T14:46:31+5:302016-05-13T14:49:42+5:30
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून याबाबतचा आदेश देण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना महासंचालकपदी तर महानिरीक्षकाना अतिरिक्त महासंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे
अतिरिक्त महासंचालक : प्रभात रंजन (1984, आयुक्त नवी मुंबई ते महासंचालक, लीगल एन्ड टेक्निकल) मीरा बोरवणकर यांच्या केंद्रातील नियुक्तीने रिक्त झालेल्या पदावर नेमणूक
व्ही. डी. मिश्रा (1989, एडिजी एस्टॅब्लिशमेन्ट ते महासंचालक महाराष्ट्र हौसिंग एन्ड वेल्फेअर कॉर्पोरेशन या रिक्त पदावर) ,
बी. के. सिंग (1990, विशेष महानिरीक्षक कारागृह ते अतिरिक्त महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
एस. के. वर्मा ( 1990, विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र ते अतिरिक्त महासंचालक CVO, MHADA, Muambai)
के. एल. बिष्णोई ( 1985, अतिरिक्त महासंचालक कायदा सुव्यवस्था ते अतिरिक्त महासंचालक तथा महाव्यवस्थापक महाराष्ट्र पोलीस हौसिंग एन्ड वेल्फेअर कोप्रोरेशन)
हेमन्त नागराळे (1987, अतिरिक्त महासंचालक तथा CVO, MHADA ते नवी मुंबई पोलीस आयुक्त)
के. के. सरंगल (1990, विशेष महानिरीक्षक ते अतिरिक्त महासंचालक CVO, विक्रीकर विभाग, मुंबई, पद उन्नत करून)
विनायक कोरगावकर (1990, विशेष महानिरीक्षक तथा CVO, विक्रीकर विभाग ते CVO, सिडको, नवी मुंबई)
अतुलचंद्र कुलकर्णी (1989, अतिरिक्त महासंचालक तथा सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था ते अतिरिक्त महासंचालक एटीएस)
विवेक फणसळकर (1989, अतिरिक्त महासंचालक एटीएस ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण (1990, अतिरिक्त महासंचालक प्रशासन ते नियोजन, महासंचालक कार्यालय)
राजेंद्र सिंग (1989, अतिरिक्त महासंचालक नियोजन ते अतिरिक्त महासंचालक प्रोव्हीजन्स)
प्रज्ञा सरवदे (1989, अतिरिक्त महासंचालक तथा CVO, सिडको ते अतिरिक्त महासंचालक प्रशासन)