प्रचारदौ:यात फिटनेसची कसोटी

By admin | Published: September 21, 2014 12:43 AM2014-09-21T00:43:30+5:302014-09-21T00:43:30+5:30

निवडणुकीच्या आखाडय़ात जशी राजकीय पक्षांची कसोटी लागत असते तशी ती राजकीय पुढा:यांची आणि कार्यकत्र्याचीही असते. निवडणुकीचा आखाडा हा आता आरोग्यासाठीचाही घातक आखाडा ठरू लागला आहे.

Promotions: The fitness test | प्रचारदौ:यात फिटनेसची कसोटी

प्रचारदौ:यात फिटनेसची कसोटी

Next
पूजा दामले- मुंबई
निवडणुकीच्या आखाडय़ात जशी राजकीय पक्षांची कसोटी लागत असते तशी ती राजकीय पुढा:यांची आणि कार्यकत्र्याचीही असते. निवडणुकीचा आखाडा हा आता आरोग्यासाठीचाही घातक आखाडा ठरू लागला आहे. 
दिवसेंदिवस राजकीय क्षेत्रकडून लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. अपेक्षांचे ओङो राजकीय नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यकत्र्यावर देखील आहे. शिवाय क्षणोक्षणी मीडियाचा वॉच नेत्यांवर असल्याने त्यांची जबाबदारी कैक पटींनी वाढली 
आहे. नेत्यांचे दिवसभराचे वेळापत्रक 
हे नेहमीच व्यस्त स्वरूपाचे असते. 
पण निवडणुकांमध्ये ते अधिकच धकाधकीचे बनते. प्रचाराच्या रणधुमाळीत सकाळी 6 ते रात्री 12 
असे फिरणो, वेळी-अवेळी वाटेल 
ते खाणो, वाढलेले वजन आणि 
त्यात व्यायामाची सवय नसल्याने गुडघ्यांचे त्रस तर हमखास नेते 
आणि कार्यकत्र्याना जडतातच. शिवाय गॅस्ट्रिक ट्रबल, थ्रोट इन्फेक्शन, ऊन लागणो, हायपर टेन्शन या 
गोष्टीही मग त्यांना आपसूकच घेरतात. त्यामुळे या गोष्टींपासून दूर 
राहायचे असेल तर जीवनशैलीत काही बदल हे करावे लागतील. खास निवडणुकीच्या निमित्ताने नेते 
आणि त्यांच्या कार्यकत्र्यासाठी 
काही मोलाच्या टिप्स आणि 
महत्त्वाची निरीक्षणो आम्ही घेऊन आलोय... नेते आणि कार्यकत्र्यानी या गोष्टी पाळल्या तर आरोग्य 
चांगले राहीलच आणि जय-पराजयाची फारशी चिंता राहणार नाही.
दिनचर्या व्यवस्थित नसल्याने अनेकांना झोप न येणो, भूक कमी लागणो असे आजार जडतात. काहींना रक्तदाबाचा त्रस देखील त्रस 
सुरू होतो. त्यामुळे नेत्यांनी आणि त्यांच्यासोबत राबणा:या कार्यकत्र्यानी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला जे. जे. रुग्णालयाचे मानसोपचार विभागप्रमुख डॉ. युसूफ माचिसवाला यांनी इच्छुक उमेदवारांना दिला आहे.
 
मधुमेह, रक्तदाब 
आहे.. मग सावधान ! 
निवडणुकीची घटिका जवळ जवळ येऊ लागली आहे. निवडणुकीचे अर्ज भरणो सुरू झाले; मात्र अजूनही उमेदवारी मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही. या ट्रॉमा सिच्युएशनमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा जीव अक्षरश: टांगणीला लागलेला आहे. अशा स्थितीत ज्या नेत्यांना आधीपासून हायपर टेन्शन, लो बीपी किंवा डायबेटिस आहे, त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. सर्वसाधारणपणो नेत्यांना ताणतणाव नियंत्रणाची ब:यापैकी सवय असते. 
 
पण सध्या लोकांच्या वाढत्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे मोठे आव्हान असल्याने तणाव देखील काही प्रमाणात असह्य होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेक नेते मानसोपचार तज्ज्ञांचादेखील सल्ला घेऊ लागले आहेत. विधानसभेच्या दर 5 वर्षानी निवडणुका येत असल्या तरी देखील अन्य निवडणुका या अध्येमध्ये होत असतातच. त्यामुळे तिकिटाची हुरहुर ते निवडणुकांची रणनीती कशी आखायची, या सगळ्य़ा गोष्टींची सवय नेत्यांना असते. 
 
रक्तदाब वाढण्याची शक्यता
निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांची धावपळ खूप वाढते. वेळापत्रकात खूप बदल झालेले असतात. अति दगदग झाल्यामुळे अनेकांचा रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. ज्या उमेदवारांना मधुमेह असतो, त्यांनाही या धावपळीचा त्रस होऊ शकतो. एखाद्या उमेदवाराला खूपच ताण आला तर त्याच्या उच्च रक्तदाबाचा त्रस वाढू शकतो. हा त्रस जास्त झाल्यास हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असते असे डॉ. प्रदीप शहा, (फिजिशियन, फोर्टीस रुग्णालय) यांनी सांगितले.
 
सकाळी चहा पिण्याची अनेकांना सवय असते. अनेकांना हा चहा कडक आणि जास्त साखरेचा लागतो. मात्र असा चहा घेणो टाळावे. कारण यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. चहा जास्त उकळू नये, चहामध्ये पुदिना, तुळशीची पाने, आलं घालावे. चहाबरोबर बेकरी प्रोडक्ट, पाव, गोड बिस्किटे खाऊ नयेत.  नाश्त्यामध्ये फळे, उपमा, पोहे (यामध्ये कांदा, टोमॅटो घालावा), मोड आलेली कडधान्ये, अंडे, पोळी यांचा समावेश असावा.
 
घशाकडे लक्ष द्या ! 
सतत बोलत राहिल्याने त्याचा परिणाम नक्कीच स्वरयंत्रवर होणार. जर सतत मोठय़ा आवाजात बोलत राहिल्यास स्वरयंत्रवर ताण येतो. यामुळे घसा दुखू शकतो
 
दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी, आळस टाळण्यासाठी स्वत:बरोबर लिंबूपाणी ठेवावे. एका लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 लिंबू पिळून न्यावे. अधूनमधून एक - एक ग्लास प्यावे. नारळपाणी पिऊ शकता. 
 
मधल्या वेळेत भूक लागल्यास बरोबर खाण्यासाठी फळे (मोसंबी, संत्री, सफरचंद, पेरू), चणो, शेंगदाणो, सुकामेवा ठेवावा.
 
दुपारच्या जेवणासाठी सॅण्डवीच घेऊन जाता येईल. यामध्ये चीज, भाज्या अथवा चिकनचा समावेश असावा. हिरवी चटणी करताना त्यामध्ये दही वापरावे. अथवा बटाटा, कोबी, मेथीचे पराठे न्यावेत. त्याबरोबर दही खावे. दह्यामुळे फायबर, कॅल्शियम, प्रोटीन शरीराला मिळते. जास्त श्रम झाल्यानंतर ते उपयोगी पडतात. 
 
दुपारच्या वेळी चहा घेण्यापेक्षा ग्रीन टी घ्यावा. ग्रीन टीचा  हृदय, मेंदूवर चहाप्रमाणो विपरीत परिणाम होत नाही.  
 
रात्री नऊनंतर जेवणार असाल, तर शक्यतो हलका आहार घ्या. यामध्ये खिचडी, भाजणी थालीपीठ, इडली, सूप या पदार्थाचा समावेश असावा. याचबरोबरीने फळेही रात्री खाऊ शकता. रात्री जास्त आहार घेतल्यास तो पचायला जड पडतो. यामुळे सकाळी त्रस होऊ शकतो. परिणामी दुस:या दिवसाच्या शेडय़ुलवर परिणाम होऊ शकतो. 
 
काय व्यायाम कराल?
1दिवसभर फ्रेश राहायचे असेल, शारीरिकदृष्टय़ा सक्षम राहायचे असल्यास आपण दिवसातून किती पाणी पितो, याकडे लक्ष द्यावे.  निवडणुकीच्या काळात उमेदवाराचे चालणो, बोलणो जास्त प्रमाणात होते. यामुळे थकवा अधिक प्रमाणात जाणवू शकतो. 
 
2या काळात उमेदवारांना चांगला व्यायाम करून त्यांना फिट राहायचे असल्यास त्यांनी रोज किमान 5 सूर्यनमस्कार घालावेत. कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. 
 
3दिवसाच्या शेवटी शरीरावरील ताण कमी करण्यासाठी किमाने 3क् मिनिटे योगासने करावीत. वेळ मिळत नसल्यास रात्री पश्चिमोतानासन, वक्रासन, वज्रासन, उभे राहून व्यायाम करायचा असल्यास अर्धकटिचक्रासन, त्रिकोणासन ही पाच आसने करावीत. 1 आसन 1 मिनीट करावे. आसन करताना हळूहळू श्वासोच्छ्वास करावा. या आसनांमुळे कंबर, पाय यांना आराम मिळेल. 

 

Web Title: Promotions: The fitness test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.