आधार दिंडीतून शेतकऱ्यांचे प्रबोधन

By admin | Published: January 25, 2016 03:01 AM2016-01-25T03:01:13+5:302016-01-25T03:01:13+5:30

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सुरू केलेली ‘ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी’ रविवारी धारूरमध्ये धडकली. वारकरी साहित्य परिषदेतर्फे काढलेल्या या

Propagation of farmers from Aadhar Dindh | आधार दिंडीतून शेतकऱ्यांचे प्रबोधन

आधार दिंडीतून शेतकऱ्यांचे प्रबोधन

Next

धारूर (बीड) : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सुरू केलेली ‘ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी’ रविवारी धारूरमध्ये धडकली. वारकरी साहित्य परिषदेतर्फे काढलेल्या या दिंडीतून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. नायब तहसीलदार के. आर. जंगले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.ह.भ.प. महादेव महाराज शिवणकर, विठ्ठलराव पाटील, ह.भ.प. बाबा महाराज रासीणकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्महत्या करून आपले कुटुंब उघड्यावर आणू नका, असे अवाहन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती चांगली आहे. गरज पडल्यास या भागातील शेतकऱ्यांची आणि त्यांच्या पशुधनाची पश्चिम महाराष्ट्रात चार महिने व्यवस्था करू, अशी माहिती पाटील यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Propagation of farmers from Aadhar Dindh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.