प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा, तहसीलमध्ये गुन्हा दाखल

By admin | Published: September 10, 2016 05:45 PM2016-09-10T17:45:02+5:302016-09-10T17:45:02+5:30

कथित कंपनीचा ऑनलाईन विस्तार दाखवून बंटी-बबलीने नागपुरातील एका प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा घातला

Property dealer has filed a complaint of Rs 47 lakh in Ganda, Tehsil | प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा, तहसीलमध्ये गुन्हा दाखल

प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा, तहसीलमध्ये गुन्हा दाखल

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - कथित कंपनीचा ऑनलाईन विस्तार दाखवून बंटी-बबलीने नागपुरातील एका प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा घातला. अहमद सोहेल अहमद अब्दुल जब्बार (वय ३८) आणि सिशा सोहेल (वय ३५) असे या ठगबाज जोडगोळीचे नाव आहे. ते हैदराबाद येथील गौरीनगर कॉलनीत राहतात. 
मोहम्मद हाजी अनिस सत्तार (वय ३८ रा. सेंट्रल एव्हेन्यू चंद्रलोक बिल्डींग) बिल्डर यांची दोन वर्षांपूर्वी एका मालमत्तेच्या सौद्यातून सोहेल आणि सिशासोबत ओळख झाली. संबंध घनिष्ट झाल्यानंतर मोहम्मद हाजी यांनी बंटी बबलीला जाफरनगरात आणि त्यानंतर अन्य एका ठिकाणी पॉश घर पाहून दिले. बंटी बबलीने हाजी यांचा विश्वास संपादन करून आपल्या कंपनीचे सर्वत्र मोठे नेटवर्क असल्याचे सांगितले. लॅपटॉपवर कंपनीची ऑनलाईन माहिती आणि विस्तारही दाखवला. त्यानंतर आपल्या कंपनीत रक्कम गुंतवल्यास अल्पावधित मोठा लाभ मिळेल, असे सांगितले. विश्वास बसल्यामुळे हाजी यांनी ऑगस्ट २०१४ ते जुलै २०१६ या कालावधीत बंटी बबलीकडे टप्प्याटप्प्याने ४७ लाख रुपये गुंतवले. हाजी यांना संशय येऊ नये म्हणून बंटी-बबली नेहमीच त्यांना कुठे किती लाभ मिळाला आणि कुठे किती फायदा झाला, त्याचीही ऑनलाईन आकडेवारी दाखवत होते. २ जुलैपासून बंटीबबली बेपत्ता झाले. दोन महिने शोधाशोध करूनही त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांचे मोबाईलसुद्धा बंद झाले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने मोहम्मद हाजी यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. डी. कुलथे यांनी ठगबाज बंटी-बबलीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. बंटी-बबलीचा शोध घेतला जात आहे. 
 
सारीच बनवाबनवी 
कंपन्यांची बनावट वेबसाईट तयार करून बंटी बबली श्रीमंत सावज सापळ्यात अडकवते. प्रारंभी महागड्या वस्तूंची खरेदी आणि मोठा खर्च करून हेरलेल्या सावजाला प्रभावित करते. विनयशिल वर्तन आणि गोडबोलेपणातून सावजाच्या घरापर्यंत संबंध वाढवायचे. त्याच्याच माध्यमातून भाड्याचे घर शोधायचे. त्यानंतर सापळळ्यात अडकलेल्याकडून मिळेल तेवढी रक्कम उकळायची आणि पळून जायचे, अशी ठगबाज बंटी बबलीची कार्यपद्धत आहे. त्यांनी हैदराबाद येथील दिलेला पत्ताही खोटा असल्याचा संशय असून त्यांनी अशाच प्रकारे अन्य ठिकाणी अनेकांना गंडा घातला असावा, असाही पोलिसांना संशय आहे. पोलीस त्याअनुषंगाने तपास करीत आहेत. 
 

Web Title: Property dealer has filed a complaint of Rs 47 lakh in Ganda, Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.