कसबा बीड-महे धरणाची उंची वाढविण्यात प्रस्ताव ३९ वर्षे अडगळीत

By admin | Published: May 6, 2014 05:09 PM2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T19:08:03+5:30

पुरपरिस्थितीत ४० गावांचे जनजीवन विस्कळीत : नेत्यांचे दुर्लक्ष

Proposal to increase the height of Kasba beed-Mahe dam damages for 39 years | कसबा बीड-महे धरणाची उंची वाढविण्यात प्रस्ताव ३९ वर्षे अडगळीत

कसबा बीड-महे धरणाची उंची वाढविण्यात प्रस्ताव ३९ वर्षे अडगळीत

Next
रपरिस्थितीत ४० गावांचे जनजीवन विस्कळीत : नेत्यांचे दुर्लक्ष

फोटो - 06एमएपी01
करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंची वाढविणे गरजेचे आहे. पूरकाळ हे धरण पाण्यासाठी बुडते.
छाया : महेश पाटील, महे.

शिवराज लोंढे
सावरवाडी : भोगावती नदी पात्रातील कसबा बीड ते महे (ता. करवीर) दरम्यान असलेल्या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तब्बल ३९ वर्षे अडगळीत आहे. धरणांची उंची वाढविण्याचे प्रस्ताव शासनदरबारी धूळ खाऊ लागले आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० गावांची वाहतूक असणार्‍या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुरपरिस्थितीचा तडाखा जनतेला बसतो. पूर काळात तुळशी भोगावती या दोन नद्याचे पाणी या धरणावर येते. परिणामी ग्रामीण वाहतूक ठप्प होते. कोल्हापूर शहराचा पावसाळ्यात संपर्क तुटला जातो. पावसाळा ऋतुमध्ये १५ दिवस ग्रामीण भागातील जनतेचे जनजीवन विस्कळीत होते. हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे पूरपरिस्थितीत उच्च शैक्षणिक नुकसान होते. पुरकाळात नावेतून प्रवास करणे कठीण बनते.
नव्या बदलत्या काळात करवीर पश्चिम भागात अजून दळण वळणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्य शासनाने २४ एप्रिल १९७३ साली या धरणांची उभारणी केली. त्यावेळी सात लाख रुपये खर्चुन हे धरण उभारले गेले. पण धरणाची मुळातच उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीत या धरणावर पाणी येते परिणामी ग्रामीण जनजीवन विस्कळीत होते. ३५ गावांची या धरणावरून वाहतूक होत असते.
गेल्या २० वर्षात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यानी शासकीय निधीतून धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेचे पावसाळ्यात हाल होतात. या धरणांच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे. पुरकाळात कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातून नावे (होडी)द्वारे प्रवास करावा लागतो.
नदीवरील धरणांची उंची कमी असल्यामुळे पावसाळा ऋतुमध्ये ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत असते. दळणवळणाचा गुंता वाढतच आहे. परिणामी ग्रामीण भागातील शेतीमाल शहरी बाजारात पूरकाळात जाऊ शकत नाही. कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंचीी वाढविणे किंवा उड्डाण पूलाची उभारणी करणे ही काळाची गरज झाली आहे. नव्या विकासात्मक बदलाकडे पश्चिम भाग मागे पडू लागल्याची चर्चा मात्र जनतेत सुरू आहे.

पॉईंटर
* धरणांच्या उंची वाढविण्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
* कमी असल्यामुळे पूरकाळात ३५ गावांचे पुरकाळात जनजीवन विस्कळीत होते
* पर्यायी उड्डाण पूलाची उभारणी करणे गरजेचे
* नावेतून प्रवास करणे धोक्याचे
* नव्या बदलत्या काळात करवीर पश्चिम भागाच्या दळणवळणाकडे दुर्लक्ष

प्रतिक्रिया
जनतेतून अनेक वर्षापासून धरणाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे काम रेंगाळले गेले. नदीपात्रात पर्यायी उड्डाण पुलाच्या पाठपुराव्यासाठी जनतेची चळपळ उभारणे गरजेचे आहे.
सज्जन पाटील, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Proposal to increase the height of Kasba beed-Mahe dam damages for 39 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.