जळगावात नाट्य संमेलन आयोजनाचा प्रस्ताव
By admin | Published: April 10, 2016 02:20 AM2016-04-10T02:20:02+5:302016-04-10T02:20:02+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आगामी ९७ वे नाट्य संमेलन जळगावात आयोजित करण्याचा अधिकृत प्रस्ताव जळगाव ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी
जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आगामी ९७ वे नाट्य संमेलन जळगावात आयोजित करण्याचा अधिकृत प्रस्ताव जळगाव ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शनिवारी सादर केला. त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुक्ताईनगर (जळगाव ग्रामीण) शाखेचे उद्घाटन अभिनेते तथा मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी महसूल तथा पालकमंत्री एकनाथ खडसे होते. तर अ.भा. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम
गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खान्देशची नाट्य संस्कृती महाराष्ट्रात पोहोचावी, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली होती. त्यास मोहन जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत खान्देशी ‘अहिराणी’ भाषेची ओळख या निमित्ताने नाट्य क्षेत्राला होईल, असे सांगितले. कार्यकारिणीपुढे हा प्रस्ताव ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
(प्रतिनिधी)