‘सोलापूरसाठी हातमाग उपकेंद्राचा प्रस्ताव द्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 01:08 AM2020-09-13T01:08:38+5:302020-09-13T01:09:01+5:30

शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, उद्यमशीलता आणि विद्यापीठांची भूमिका या विषयावरील आयोजित आॅनलाइन राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

'Propose handloom substation for Solapur' | ‘सोलापूरसाठी हातमाग उपकेंद्राचा प्रस्ताव द्या’

‘सोलापूरसाठी हातमाग उपकेंद्राचा प्रस्ताव द्या’

Next

सोलापूर : सोलापूरला डाळिंब, ऊस, बोर यासारख्या पिकांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग निर्मिती शक्य आहे. हातमाग व यंत्रमागाच्या विकासासाठीही विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. यासाठी सोलापूर विद्यापीठात हातमाग व यंत्रमाग उपकेंद्र सुरू करण्याकरिता प्रस्ताव दिल्यास त्यास मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली़
शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, उद्यमशीलता आणि विद्यापीठांची भूमिका या विषयावरील आयोजित आॅनलाइन राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाकडून उद्योगवाढीसंदर्भात करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले,सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून समाजाचा व देशाचा चौफेर विकास होतो. उत्पादन वाढवून आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Web Title: 'Propose handloom substation for Solapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.