अकोला परिमंडळात ४९ कोटींची कामे प्रस्तावित

By admin | Published: February 22, 2016 02:17 AM2016-02-22T02:17:00+5:302016-02-22T02:17:00+5:30

एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत वीजप्रणाली बळकट करणार.

Proposed works of 49 crores in Akola area | अकोला परिमंडळात ४९ कोटींची कामे प्रस्तावित

अकोला परिमंडळात ४९ कोटींची कामे प्रस्तावित

Next

अतुल जयस्वाल / अकोला
केंद्र सरकारने सुरू केलेली एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) आता राज्यातही लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या अकोला परिमंडळांतर्गत येणार्‍या २२ शहरांमध्ये ४८.८0 कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे.
शहरांमधील वीजप्रणाली बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) सुरू केली आहे. या योजनेसाठी राज्य शासन, पॉवर फायनान्स कार्पोरेशन व महावितरण यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता गत महिन्यात देण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये २ हजार ४0५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सदर योजनेंतर्गत अकोला परिमंडळातील नगर परिषद व महानगरपालिका असलेल्या एकूण २२ शहरांमध्ये ४८.८0 कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अकोला जिल्ह्यात १७.४६ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात १९ कोटी, तर वाशिम जिल्ह्यात १२ कोटी रुपयांची कामे होणार आहेत.
परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये ह्यआयपीडीएसह्ण योजनेंतर्गत विविध कामे होणार आहेत. यामध्ये ३३ केव्ही क्षमतेची आठ विद्युत उपकेंद्रे उभारणे, पाच ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविणे, एका पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, ४६0 रोहित्रे बसविणे आदी कामे प्रस्तावित आहेत. वीजवितरण क्षेत्रात सुधारणा करणे व ग्राहकांना दज्रेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने ही कामे प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Proposed works of 49 crores in Akola area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.