देशविरोधी कट रचल्याचा गुन्हा सिध्द
By admin | Published: April 1, 2017 05:50 PM2017-04-01T17:50:07+5:302017-04-01T17:50:07+5:30
दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा न्या.ए.के. पटनी यांनी सुनावली.
सिमी खटल्याचा निकाल : जळगावच्या परवेज व आसिफ खानला 10 वर्षे सक्तमजुरी
जळगाव : देशभर गाजलेल्या जळगावच्या सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या खटल्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा न्या.ए.के. पटनी यांनी सुनावली. फौजदारी कट कारस्थान 120 (ब) या कलमान्वये दोघांना शुक्रवारीच दोषी ठरविण्यात आले होते.
महाराष्ट्रात हिंदू वस्त्यांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रय} तसेच देशविघातक कृत्य करणा:या 10 जणांविरुध्द 25 जुलै 2001 रोजी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा निकाल 19 मे 2006 रोजी लागला होता. त्यात 6 आरोपींना शिक्षा झाली होती तर 4 आरोपी निदरेष मुक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत या गुन्ह्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
दोघांना 2006 मध्ये झाली अटक
30 डिसेंबर 2006 रोजी आसिफला स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वाय.डी.पाटील यांनी अटक करून 23 जुलै 2007 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते तर परवेजला 23 ऑगस्ट 2006 रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांनी अटक करण्यात येऊन 20 ऑक्टोबर 2006 रोजी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा झाल्याने आसिफ हा पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे तर परवेज जामिनावर होता.