अहेरी तालुक्यात आढळला प्रोजेरियाचा संशयित रूग्ण

By admin | Published: October 10, 2016 12:23 PM2016-10-10T12:23:56+5:302016-10-10T12:25:15+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या कापेवंचा गावात दुर्घर व दुर्मिळ अश्या प्रोजेरिया आजाराचा संशयित रूग्ण आज अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आढळून आला.

Prosecutor suspect found in Aheri taluka | अहेरी तालुक्यात आढळला प्रोजेरियाचा संशयित रूग्ण

अहेरी तालुक्यात आढळला प्रोजेरियाचा संशयित रूग्ण

Next
>प्रतिक मुधोळकर, ऑनलाइन लोकमत
अहोरी ( गडचिरोली), दि. १० - गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या कापेवंचा गावात दुर्घर व दुर्मिळ अश्या प्रोजेरिया आजाराचा संशयित रूग्ण आज अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आढळून आला.
   राजू रमेश मडावी रा कापेवंचा असे बालकाचे नाव असून तो ४ महिन्याचा आहे. मागील काही दिवसापासून त्याची प्रकृति ठीक नव्हती. मात्र मागील काही दिवसापासून राजू च्या डोक्याची असाधारण वाढ होतांना त्याच्या पालकांना दिसली त्यावर त्यांनी आज त्याला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. ईशान तुरकर यांनी त्याची तपासणी केलि त्यांना राजू च्या डोक्याची असाधारण वाढ दिसली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमके रोग आणि डोक्याची असाधारण वाढि चे कारण जाणून घेण्यासाठी राजू ला चंद्रपुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०८ रुग्णवाहीकेने रेफर करण्यात आले. तिथे विविध तपासन्या झाल्यावर हा रोग नक्की प्रोजेरियाच आहे की नाही याचे निदान होणार आहे.
काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन चा "पा" हा हिंदी चित्रपटाद्वारे प्रोजेरिया रोगाचे मोठ्या डोक्याचे रूग्ण सर्वश्रुत झाले होते. जगात या आजाराचे रूग्ण अत्यल्प प्रमाणात असतात. गड़चिरोली जिल्ह्यात प्रोजेरिया संशयित रूग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
विविध कारणांमुळे बालकांच्या डोक्याची वाढ होत असते. राजू ला प्रोजेरिया रोग असू किंवा नसु पण शकतो. राजूस प्रोजेरिया रोग आहेच असे आताच सांगता येणार नाही. राजूच्या पुढील तपासणी नंतर त्याच्या रोगाचे नेमके कारण कळू शकेल. जगात प्रोजेरिया रोगाचे रूग्ण खुप कमी प्रमाणात आढळतात.
- डॉ. ईशान तुरकर, वैद्यकीय अधिकारी अहेरी उपजिल्हा रुग्णालय

Web Title: Prosecutor suspect found in Aheri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.