चाकरमान्यांच्या सुरक्षेसाठी चिमुकल्यांचे बाप्पाला साकडे
By Admin | Published: August 27, 2016 09:35 PM2016-08-27T21:35:46+5:302016-08-27T21:36:33+5:30
गणेशोत्सवादरम्यान महाडसारखी दुर्घटना घडू नये यासाठी लालबागच्या गुरुकूल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी थेट बाप्पालाच साकडे घातले आहे
>कलेच्या माध्यमातून चिमुकल्यांची किमया
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - महाड दुर्घटनेमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. त्यामुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवादरम्यान अशी घटना घडू नये यासाठी लालबागच्या गुरुकूल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी थेट बाप्पालाच साकडे घातले आहे.
शनिवारी या चिमुरड्यांनी विविध पद्धतीने चित्र साकारून बाप्पाला साकडे घातले. कोकणातील रस्त्यांवरही खड्डे वाढले आहेत. शिवाय, या मार्गांवरील काही पूलही धोकायदायक असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात प्रचंड संख्येने कोकणात दाखल होणाºया चाकरमान्यांना सुरक्षित ठेव, त्यांच्याकडे लक्ष दे असा संदेश देणारी चित्रे या चिमुरड्यांनी साकारली.
शिवाय, यंदाच्या वर्षी ही परिस्थिती सांभाळून घे, पुढल्या वर्षी हे रस्ते नक्की नीट होतील अशी आशा व्यक्त करणारा संदेशही या चित्रांमध्ये रेखाटण्यात आला होता. गुरुकूलच्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सामाजिक भान राखत तत्कालीन विविध विषयांवर भाष्य करणारे कलात्मक उपक्रम राबविले आहेत.