लोकप्रतिनिधींना संरक्षण देणार
By admin | Published: April 12, 2016 03:10 AM2016-04-12T03:10:24+5:302016-04-12T03:10:24+5:30
लोकप्रतिनिधींना होणारी मारहाण, सरकारी कर्मचाऱ्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणुकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधींना कायद्याचे संरक्षण
मुंबई : लोकप्रतिनिधींना होणारी मारहाण, सरकारी कर्मचाऱ्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणुकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधींना कायद्याचे संरक्षण देण्यासाठी लवकरच सर्वच पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.
लोकप्रतिनिधींना मारहाण झाली, तर त्याचे राजकारण केले जाते व कायद्याचे संरक्षण मिळत नाही. सत्तारूढ आणि विरोधक असा भेदभाव कायद्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींबाबत करणे योग्य होणार नाही.
सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण झाली, तर लगेच त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते, अशी भावना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात मांडली.
लोकप्रतिनिधींनादेखील कायद्याचे संरक्षण मिळावे, यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. यावर, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)