५० टक्के गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचे कवच; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर सदावर्तेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:01 PM2023-12-06T12:01:15+5:302023-12-06T12:11:21+5:30
सर्वोच्च न्यायालयात मराठा आऱक्षणाच्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी आहे. त्यातच आज आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. याचे निमित्त साधून अॅड. सदावर्ते यांनी ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा काढला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खुल्या वर्गातून ५० टक्के जागा असतील असे सांगितलेले. या गुणवंतांसाठी ब्राम्हण, वैश्य, जैन आणि बौद्ध यांच्यासाठी असतील, गुणवंतांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे कवच आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आऱक्षणाच्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी आहे. त्यातच आज आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. याचे निमित्त साधून अॅड. सदावर्ते यांनी ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा काढला आहे.
सर्वोच्च न्यायालयात या देशाचे जे पुस्तक आहे संविधान त्यानुसार आंबेडकरांनी दिलेले ५० टक्के आरक्षणाचे कवच निश्चितच संरक्षित करेल याची मला खात्री असल्याचेही सदावर्ते म्हणाले. डंके की चोट पर सांगतो, ५० टक्क्यांच्या वर आरक्षणाची टक्केवारी जाणार नाही याचा मला विश्वास आहे, असे सदावर्ते म्हणाले.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना आज सुप्रीम कोर्टात आरक्षणावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केले होते. आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं टिकवलेल्या मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती.
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल हा १०० टक्के विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात जे आरक्षण टिकले त्या आरक्षणाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारं आरक्षण मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.