कोलोली प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळली
By Admin | Published: May 6, 2014 05:36 PM2014-05-06T17:36:32+5:302014-05-06T19:10:20+5:30
कोतोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून असणारी संरक्षण भिंत अनेक दिवसापासून कोसळली आहे. पण याकडे शालेय व्यवस्थापन कमिटीचे दुर्लक्ष होत आहे.
क तोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून असणारी संरक्षण भिंत अनेक दिवसापासून कोसळली आहे. पण याकडे शालेय व्यवस्थापन कमिटीचे दुर्लक्ष होत आहे. ही भिंत पन्हाळा पंचायत समितीच्या माध्यमातून सुमारे ५० हजार रुपये खर्च करून ही भिंत बांधण्यात आली आहे. सन १९९९-२००० साली या कामाची मंजुरी व उद्घाटन माजी उपसभापती भीमराव पोवार यांनी केले होती. या सदरच्या भिंतीला सुमारे १३ वर्ष पूर्ण होत आली असून मध्यभागी ही भिंत कोसळली असून दररोज दोन्ही बाजूचे भिंतीचे दगड खाली निघून पडत आहेत. गावाला लागूनच व गाडाईदेवी मंदिराच्या शेजारी असणार्या या प्राथमिक शाळेत लहान मुलांची खेळण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. पटांगणात खेळत असताना काही मुले या दोन्ही भिंतीच्या मधून ये-जा करताना दिसत आहेत. पण दोन्ही बाजूचे दगड बांधकामामधून निघून खाली पडत आहेत. पण यातील एखादा दगड मुलाच्या अंगावर पडल्यास अपघात होऊ शकतो. यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटीने याकडे लक्ष द्यावे व आता निकालानंतर शाळांना सु्या पडणार आहेत. त्यावेळेत किमान पडलेल्या दोन्ही भिंतीचे काम करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी पालकांच्यातून होत आहे. फोटो - मेलवर कोलोली येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून बांधलेल्या संरक्षण भिंत कोसळली आहे.गायत्री फोटो, कोलोली.