राजगृह निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा निषेध- बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:24 PM2020-07-08T14:24:10+5:302020-07-08T14:25:01+5:30
आमचे नेते आणि काँग्रेस पक्ष अशा दबावाला न जुमानता राष्ट्रहितासाठी आवाज उठवत राहतील, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल, असंही ठाकरे सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. काही समाजकंटकांनी राजगृहावर नासधूस केल्याची बातमी समजली. राजगृह हे लोकशाहीवर संविधानावर श्रद्धा असणा-यांचे प्रेरणास्थान आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती या वास्तूशी जोडल्या गेलेल्या आहेत. हल्ला करणा-या मनोवृत्तीचा निषेध केला पाहिजे, या घटनेची चौकशी करून आरोपींना शोधून कठोर शासन केले पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
तसेच त्यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला मा. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी प्रश्न विचारल्याने ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे नेते आणि काँग्रेस पक्ष अशा दबावाला न जुमानता राष्ट्रहितासाठी आवाज उठवत राहतील, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरूंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
हेही वाचा
एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक
SBIचं कोट्यवधी ग्राहकांना मोठं गिफ्ट! 14व्यांदा घटवले व्याजदर, आता EMI होणार कमी
भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...
STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार
मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे