खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा 'गद्दार दिवस' म्हणून निषेध करा; NCP चे कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 08:59 PM2023-06-17T20:59:47+5:302023-06-17T21:00:55+5:30

शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा असं पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Protest against CM Eknath Shinde and the government on June 20, ordered by NCP state president Jayant Patil | खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा 'गद्दार दिवस' म्हणून निषेध करा; NCP चे कार्यकर्त्यांना आदेश

खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा 'गद्दार दिवस' म्हणून निषेध करा; NCP चे कार्यकर्त्यांना आदेश

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या २० जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण होईल. या दिवशी धोक्यातून झालेल्या सत्तांतराचा 'गद्दार दिवस' म्हणून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा. शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा. शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा. अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा असं प्रदेशाध्यक्षांनी सूचित केले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. 

या पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषणावह नाही. मुंबई चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात घडलेली मुलीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करुन सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार कारभार करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेस खतपाणी मिळेल असं त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे.पुरोगामी महाराष्ट्रात घडत असलेल्या या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल, अशी मागणी जयंत पाटील यांनी पत्रात केली आहे. 

Web Title: Protest against CM Eknath Shinde and the government on June 20, ordered by NCP state president Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.