माजी सैनिकाचे घर पाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन
By Admin | Published: January 26, 2017 04:13 PM2017-01-26T16:13:05+5:302017-01-26T16:13:05+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 26 - त्रंबकेश्वर शहरातील एका माजी सैनिकाचे घर बेकायदा ठरवून ते हटविल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयात ...
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 26 - त्रंबकेश्वर शहरातील एका माजी सैनिकाचे घर बेकायदा ठरवून ते हटविल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशासाठी हटून बसलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आंदोलकांना आज पोलिसांनी बलपूर्वक हटवून अटक केली, आज दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला. विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आज बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले होते. नंतर प्राजसत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजाला वंदन करण्याची परवानगी मागण्यात आली परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलनाचा त्यांचा इरादा लक्षात आल्या नंतर आंदोलकांना हटविण्याची तयारी पालिसांनी केली.
यावेळी आंदोलकांनी मानवी साखळी करून पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आंदोलकांना बलपूर्वक हटवून या आंदोलकांना पोलीस ठाण्यात नेले आंदोलनात महिला सहभागी होत्या त्यांना ही पोलिसांनी हटविले. सुमारे 20 मिनिटे ही धुमश्चक्री चालली.
{{{{dailymotion_video_id####x844q17}}}}