शेतकरी लाभापासून वंचित, प्रकाश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

By Admin | Published: July 2, 2016 09:04 PM2016-07-02T21:04:06+5:302016-07-02T21:04:06+5:30

लाभार्थी ठरलेल्या गावातील शेतक-यांना या योजनांचा लाभ मिळावा, अन्यथा शिवसेना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला

The protest of deprivation, Prakash Jadhav from farmers' benefit | शेतकरी लाभापासून वंचित, प्रकाश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

शेतकरी लाभापासून वंचित, प्रकाश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. 02 - २०१४-१५ या वर्षात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या क्षेत्रातील शेतक-यांसाठी अनेक सवलतीच्या योजना राज्य शासनाने लागू केल्या होत्या. मात्र योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. लाभार्थी ठरलेल्या गावातील शेतक-यांना या योजनांचा लाभ मिळावा, अन्यथा शिवसेना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला. 
 
शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान प्रकाश जाधव यांनी शासन व प्रशासनाच्या नियोजनावर टीका केली. सतत तीन वर्षाचा दुष्काळ लक्षात घेता पीडित गावांची नोंदणी करण्यात आली. त्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ११८६२ गावांची निवड करण्यात आली. या गावांसाठी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या. यामध्ये शेतीशी निगडित कर्जाची वसुली स्थगित करणे, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करणे, जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शेती पंपाची वीज जोडणी व शेतक-यांना कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय २२ एप्रिल २०१६ ला घेण्यात आला. मात्र हा निर्णय जाहीर होऊनही शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नसल्याचा आरोप प्रकाश जाधव यांनी केला. विविध साधनांचा वापर करून या योजनांची प्रसिद्धी करणे गरजेचे होते. मात्र शासनाने शेतक-ना योजनांपासून डावलण्यासाठी प्रसिद्धीच केली नसल्याची टीका जाधव यांनी केली. सहकारी व राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकºयांना कर्ज मिळत नसून पीक विम्याच्या नावाखाली नियमबाह्य कपात केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी शेतकºयांच्या हितासाठी पक्षाचे धोरण निश्चित आहे. शेतकºयांना योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येत्या ५ जुलै रोजी संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले जाईल, असे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

Web Title: The protest of deprivation, Prakash Jadhav from farmers' benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.