पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने एसएफआयचे विद्यापीठात आंदोलन

By admin | Published: February 27, 2017 02:28 PM2017-02-27T14:28:50+5:302017-02-27T14:54:15+5:30

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)आणि स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय ) या संघटनांमध्ये निर्माण झालेला वाद आणखी वाढला आहे.

The protest movement in SFI University rejected the permission of police to protest | पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने एसएफआयचे विद्यापीठात आंदोलन

पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने एसएफआयचे विद्यापीठात आंदोलन

Next

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 27 -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह पोस्टर लावल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)आणि स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय ) या संघटनांमध्ये निर्माण झालेला वाद आणखी वाढला आहे.  एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठात निषेधार्थ मोर्चा काढण्यास पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र,पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. तरीही विद्यापीठात विद्यार्थी संघटनांनी घोषणाबाजी केले.त्यामुळे विद्यापीठात तणावाचे आतावरण निर्माण झाले आहे.
 
विद्यापीठाच्या आवारात एसएफआयला आंदोलन करण्यास परवागनी नाकारली जाते. मात्र,अभाविपला शनिवार वाड्यापासून मोर्चा काढण्यास परवानगी दिली जात आहे. त्यामुळे एकाच शहरात पोलिसांकडून दोन संघटनांच्याबाबतील दुजाभाव दाखवला जात असल्याचा आरोप एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला.  तसेच विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या गुंडावर विद्यापीठाने व पोलिसांनी कारवाई करावी,अशी मागणीही यावेळी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली.
 
 एसएफआय संघटनेस पुरोगामी विचारसरणीच्या विविध संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच भाजपचे आमदार प्रकाश परिचारक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला.दरम्यान,पोलिसांनी  विद्यापीठात जमाव बंदी लागू केली आहे. तरीही विद्यापीठात विविध संघटना आक्रमक होऊन घोषणा दिल्या जात आहेत.

Web Title: The protest movement in SFI University rejected the permission of police to protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.