शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 09:05 PM2022-10-10T21:05:24+5:302022-10-10T21:10:01+5:30
सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला असून धुळे जिल्ह्यात देखील यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाने देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून धुळे जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा या सह विविध 15 मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करीत राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून धुळे जिल्ह्यात देखील कपाशी, सोयाबीन, मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाने देखील मोठ्या प्रमाणावर झोडपल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच दिवाळी अगोदर पिकाचे नुकसान भरपाई द्यावी, केंद्र सरकारने कापसाच्या आयात शुल्क माफ करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात आले.
सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राज्य सरकार एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात मश्गुल असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे असा राज्य सरकारवर घणाघात यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे.