आंदोलक धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत

By Admin | Published: March 12, 2016 01:34 AM2016-03-12T01:34:49+5:302016-03-12T01:34:49+5:30

जमावबंदी आदेश लागू करून आंदोलकांना अर्ध्या रस्त्यातच पोलिसांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह ताब्यात घेतल्याने ते धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत.

The protesters have not reached the dam | आंदोलक धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत

आंदोलक धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत

googlenewsNext

मार्गासनी : जमावबंदी आदेश लागू करून आंदोलकांना अर्ध्या रस्त्यातच पोलिसांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह ताब्यात घेतल्याने ते धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने गुंजवणी धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता.
वेल्हे तालुक्यातील काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी येथील शिवगोरक्ष कार्यालयात झालेल्या सभेस आमदार संग्राम थोपटे, वेल्हे तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष दसवडकर, तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप लोहकरे, नाना राऊत, रामनाना कोकाटे, वेल्हेच्या सभापती सविता वाडघरे, चतुरा नगिणे, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, भगवान पासलकर, आकाश वाडघरे, संदीप नगिने, गणपत देवगिरीकर आदी कार्यकर्ते व सुमारे ४०० धरणग्रस्त आंदोलनासाठी उपस्थित होते.
जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी, ‘धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही’ या दिलेल्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आतापर्यंत वाट पाहिली. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करून आम्ही पाणी जाऊ देणार नाही. जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात एक गुंठाही जमीन संपादित नाही. यावर ते एक शब्दही काढत नाहीत. मात्र पाणी नेण्यासाठी खटाटोप करत आहेत. आज होणाऱ्या आंदोलनासाठी मोठा पोलीस फौजफाटा पाठवून आंदोलन गप्प करण्याचा हा प्रयत्न धरणग्रस्त खपवून घेणार नाहीत़, असा इशारा या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी दिला.
या वेळी भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, प्रकल्प अधिकारी आर. बी. पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन धरणाचे काम बंद न करण्याची विनंती केली. येत्या १४ मार्चला बैठक होणार असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलकांनी बैठक घेईपर्र्यंत धरणाचे काम बंद करण्याची मागणी केली. मात्र त्यास नकार मिळाल्यावर थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी धरणाकडे जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी धरणाकडे जाणारा रस्ता बंद करून थोपटे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून जामिनावर सोडण्यात आले.
बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर, शाहीद पठाण यांच्यासह मोठा बंदोबस्त व राखीव पोलीस दल या वेळी तैनात करण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: The protesters have not reached the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.