शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 02:48 PM2023-10-04T14:48:49+5:302023-10-04T14:48:57+5:30

शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Proud to have the privilege of taking Chhatrapati Shivaji Maharaj waghnakh to Maharashtra; Opinion of Sudhir Mungantiwar | शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

googlenewsNext

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

 शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग असून  शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.शिवराज्याभिषेकाच्या निमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं हा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आयुष्यातील महत्वाच्या आणि संस्मरणीय प्रसंगापैकी एक असा आजचा हा प्रसंग असल्याचं सांगितले. तसेच महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

रयतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या दाढेत स्वतःला झोकून ज्या क्रूर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला ती वाघनखं माझ्या शिवबाच्या मातृभूमीत, महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय हा अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नव्हते तरी आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत; ते आमचा स्वाभिमान आहेत, ती आमची प्रेरणा आहे, ती आमची ऊर्जा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्ष्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य विभागाने केलेला संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पूर्णत्वाकडे जातोय याचा अतिशय आनंद होतोय असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान,  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट म्यूझियम यांच्या दरम्यान जो MOU झाला, त्यानुसार ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे. 

Web Title: Proud to have the privilege of taking Chhatrapati Shivaji Maharaj waghnakh to Maharashtra; Opinion of Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.