असंघटित कामगारांना सुरक्षा देणार -मुख्यमंत्री
By admin | Published: February 26, 2015 02:16 AM2015-02-26T02:16:27+5:302015-02-26T02:16:27+5:30
राज्याच्या आर्थिक विकासात कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे. कामगारांना शेतीवर आधारित उद्योगासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य
मुंबई - राज्याच्या आर्थिक विकासात कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे. कामगारांना शेतीवर आधारित उद्योगासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य विकास निर्माण करण्यासाठी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षण देणे अनिवार्य आहे. शासन असंघटित कामगारांना सामाजिक व कायदेशीररीत्या सुरक्षा प्रदान करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवनार येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेद्वारे आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. या वेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक एस. परशुराम, प्रा. बिनो पॉल, प्रा. कपिल पाटील, प्रा. धुराडकर यांच्यासह संस्थेचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
असंघटित कामगारांना शेतीवर आधारित उद्योग-व्यवसाय करण्यासाठी संस्थांनी सुद्धा कामगारांना प्रगत करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.