४३ शहरांना शाश्वत पाणीपुरवठा करणार

By admin | Published: August 13, 2015 03:39 AM2015-08-13T03:39:39+5:302015-08-13T03:39:39+5:30

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे.

Providing sustainable water to 43 cities | ४३ शहरांना शाश्वत पाणीपुरवठा करणार

४३ शहरांना शाश्वत पाणीपुरवठा करणार

Next

- संदीप प्रधान,  मुंबई
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या योजनेकरिता केंद्र सरकार एक हजार कोटी रुपये देणार असून, उर्वरित रक्कम राज्य शासन व संबंधित शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे करावे लागणार आहेत.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांच्या नावाची शिफारस करायची होती. याकरिता स्पर्धेत ४४ शहरे होती. मात्र या योजनेकरिता प्रत्येक शहरातील महापालिकेला पाच वर्षांत २५० कोटी रुपये उभे करायचे होते. साहजिकच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूरयासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम शहरांनी बाजी मारली. येत्या दोन-तीन वर्षांत महापालिका निवडणुका असलेल्या शहरांचाच स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला गेला, अशी टीका केली गेली. नांदेड शहराचा समावेश न झाल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली होती. केंद्राची दुसरी योजना शाश्वत पाणीपुरवठ्याची आहे. या योजनेत पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे, पाणीपट्टीची वसुली करण्याची यंत्रणा सुधारणे याचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त वस्ती असलेल्या ४३ शहरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या शहरांखेरीज अन्य शहरांचा प्राधान्याने या योजनेत समावेश केला जाईल, असे नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. केंद्राच्या एक हजार कोटी रुपयांखेरीज उर्वरित एक हजार कोटी रुपये उभे करताना राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांचा वाटा किती असेल, त्याचे सूत्र लवकरच नक्की केले जाईल.
राज्यातील बहुतांश शहरातील लोकसंख्येला त्यांच्या गरजेइतका पाणीपुरवठा होत नाही. काही शहरांना पाणीपुरवठा पुरेसा केला जातो. मात्र वितरण व्यवस्था सदोष असल्याने नुकसान होते. मराठवाडा व विदर्भातील छोट्या शहरांवर या योजनेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

या शहरांचा समावेश
सोलापूर, मीरा-भायंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, ईचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भूसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया,सातारा, बार्शि, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदूरबार, वर्धा, उदगीर, हिंगनघाट

Web Title: Providing sustainable water to 43 cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.