पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे

By दीपक शिंदे | Published: August 27, 2022 10:18 PM2022-08-27T22:18:11+5:302022-08-27T22:28:17+5:30

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही

Provision of Rs.450 crore for connecting West Maharashtra and Konkan - Eknath Shinde | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे

Next

सातारा - राज्यातील पश्र्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागात  पर्यटनासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग जोडण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाबळेश्वर येथील राजभवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पत्रकार परिषदेस जिल्हधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी पाटील, तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपटी ते तापोळासाठी १५० कोटी आणि कास ते बामनोलीसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे. त्यासाठी एमटीडीसी आणि एमआयडीसीच्या विभागीय अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा पर्यटन आणि उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे.
ते पुढे म्हणाले, महाबळेश्वर येथे पार्किंगची समस्या असून दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच  महाबळेश्वरच्या सुशोभीकरणासाठी उर्वरित निधी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सोळशी येथे साडे सहा टीएमसी धरण बांधण्यासाठी सर्व्हे करण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे पाणी दुष्काळी भागासाठी देण्यात येणार आहे.

प्रतापगडाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात आला असून प्रतापगडसाठी सुकानु समितीही नेमली आहे. दुर्गम भागातील लोक आणि विद्यार्थ्यांसाठी छोट्या मिनी बस देण्यात येणार आहेत. बोट क्लबला रीतसर परवानगी देणे,बार्ज खरेदी करणे, बेल एअर साठी ३ कोटीचा निधी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी, इको सेन्सिटिव्ह झोन मधील गावांचा विकास, महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी साठी तज्ञ लोकांची नेमणूक करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सर्वांच्या टीकांना कामाने उत्तर देणार
राज्यामध्ये सध्या अनेक जण एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र मी कोणावरही टीका करणार नाही तर सर्वांच्या ठिकाणांना कामाने उत्तर देईल अशा प्रकारचा अर्थविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Provision of Rs.450 crore for connecting West Maharashtra and Konkan - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.