महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी केंद्रांकडून 20 हजार कोटी रुपयांची तरतूद
By admin | Published: August 21, 2016 03:39 PM2016-08-21T15:39:18+5:302016-08-21T15:39:18+5:30
महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी आज नाशिक इथं दिली
ऑनलाइन लोकमत
नाशिक , दि. २१ - महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून 11 रेल्वे मार्गांचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी आज नाशिक इथं दिली. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील चौथ्या प्लॅटफॉर्मचे उदघाटन तसेच अन्य विकास कामाच्या लोकार्पण सोहळा आज सिन्हा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवाशांची आणि माल वाहतुकीची संख्या वाढली , मात्र त्या तुलनेत रेल्वेचा विकास झाला नाही त्यामुळे आता केंद्र सरकारने सव्वा लाख कोटी रुपयांची रेल्वे विकासासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगून सिन्हा यांनी महाराष्ट्रात नवीन नाशिक पुणे रेल्वे मार्ग तसेच मनमाड-मालेगाव- इंदूर मार्गाचा तसेच मनमाड - दौड रेल्वे मार्गाचा विकास करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचा अनुशेष भरून काढत असल्याचं सांगितलं यावेळी आमदार योगेश घोलप यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते.