मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ६१ कोटींची तरतूद
By admin | Published: January 17, 2015 12:10 AM2015-01-17T00:10:55+5:302015-01-17T00:10:55+5:30
अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी ६१ कोटी ८ लाख रुपयाच्या खर्चाला मंजुरी.
वाशिम : अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी ६१ कोटी ८ लाख रुपयाच्या खर्चाला शासनाने गुरूवारी मंजुरी दिली.
अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २00८-0९ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. निधीअभावी शिष्यवृत्ती वितरणात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून केंद्र शासनाने भरिव स्वरुपाच्या निधीची तरतूद केली आहे. २0१४-१५ या वर्षात शिष्यवृत्ती देण्यासाठी केंद्र शासनाने ७५ कोटी १६ लाख ३७ हजार २१८ रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. या निधीपैकी शिष्यवृत्तीसाठी ६१ कोटी आठ लाख रुपयांच्या खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक प्रवर्गातील मॅट्रिकपूर्व शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.