मनोरुग्णाला वेठबिगारीसाठी विकले
By admin | Published: March 11, 2017 12:47 AM2017-03-11T00:47:30+5:302017-03-11T00:47:30+5:30
शिरुर तालुक्यातील कुरुळी येथील ज्येष्ठ मनोरुग्ण व्यक्तीला घरकामासाठी अवघ्या दोन हजार रुपयाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिरसगाव काटा (जि. पुणे) : शिरुर तालुक्यातील कुरुळी येथील ज्येष्ठ मनोरुग्ण व्यक्तीला घरकामासाठी अवघ्या दोन हजार रुपयाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुनीर रहिमान जखाते यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर गौतम भोसले (वय २०), सदाशिव टुले या दोघांना अटक करण्यात आली असून शंभू चव्हाण असे फरारी आरोपीचे नाव आहे. रहिमान रसूल जखाते असे मनोरुग्ण वृद्धाचे नाव आहे. रहिमान हे ४ तारखेला घरातून अचानक निघून गेले होते. या वेळी कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतु ते न सापडल्याने त्यांनी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल दिली. पोलिसांनी तपास पथक स्थापन करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)