शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कलापथकं करणार जनजागृती!

By admin | Published: February 27, 2016 01:31 AM2016-02-27T01:31:50+5:302016-02-27T01:31:50+5:30

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने कलापथकांचा उपक्रम हाती घेतला.

Public awareness campaign to prevent farmers from suicidal! | शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कलापथकं करणार जनजागृती!

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कलापथकं करणार जनजागृती!

Next

राम देशपांडे/ अकोला
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा संचालित जिल्हा माहिती केंद्रांच्या वतीने प्रत्येक ग्रामपातळीवर कलापथकांची निवड करण्यात येत आहे. विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
ह्यघोर मनाला लावू नका, वाट जगाला दावू नका. तुमच्या पाठिशी आम्ही आहोना बापा, जहर खाऊ नका..ह्ण असे विनवणीचे सूर, लवकरच विभागातील ग्रामीण जनतेला ऐकायला मिळणार आहेत. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा कार्यालयामार्फत कलापथकांची निवड केली जात आहे. जिल्हा स्तरावर निवडण्यात येणार्‍या या कलापथकांतील लोककलावंत प्रत्येक तालुक्यात जाऊन पथनाट्य, लोकनृत्य, एकांकिका, भजन-कीर्तन, गोधळ, सप्तखंजिरी आदींच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम करणार आहेत. याव्यतिरिक्त शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यदेखील ही कलापथके करणार आहेत.

Web Title: Public awareness campaign to prevent farmers from suicidal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.