रेल्वे पोलीस 'या' मुलाच्या माध्यमातून करणार जनजागृती
By admin | Published: November 6, 2016 11:52 AM2016-11-06T11:52:23+5:302016-11-06T11:52:23+5:30
रेल्वेतून प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणा-यांना परावृत्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आता जनजागृती करणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - रेल्वेतून प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणा-यांना परावृत्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आता जनजागृती करणार आहेत. रेल्वे पोलिसांना जनजागृतीसाठी एक मुलगा सापडला आहे. विशेष म्हणजे जनजागृती करणारा मुलगा हा स्वतः स्टंटबाजी करताना बचावला आहे.
दरम्यान, 30 ऑक्टोबरला चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधून चर्नी रोड स्टेशनवर 17 वर्षीय युवकाचा स्टंटबाजी करतानाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यानंतर रेल्वे पोलिसांनी या मुलाचा शोध घेतला. आता त्याच्याच माध्यमातून स्टंटबाजांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस जनजागृती करणार आहेत.
आलम खान असं या मुलाचं नाव असून, तो भाईंदर पूर्वेला राहतो. रेल्वेच्या प्रवासादरम्यान दरवाज्यावर उभा असलेल्या आलमला रेल्वेच्या खांबाचा धक्का लागून तो खाली पडला होता. याचदरम्यान त्यानं स्वतःचा एक व्हिडीओ शूट केला होता. त्यावेळी अनेकांना वाटलं की त्याचा त्या अपघातात मृत्यू झाला. मात्र तो जिवंत असून, रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध लावला आहे.