आगप्रतिबंधाविषयी जनप्रबोधन सुरू
By admin | Published: April 20, 2015 03:01 AM2015-04-20T03:01:37+5:302015-04-20T03:01:37+5:30
वाढती लोकसंख्या आणि घनदाट वसाहतींचे महानगर असलेल्या मुंबईमध्ये महापालिकेचे अग्निशमन दल हे अत्यंत सक्षम आणि स्तुत्य अशी नागरी
मुंबई : वाढती लोकसंख्या आणि घनदाट वसाहतींचे महानगर असलेल्या मुंबईमध्ये महापालिकेचे अग्निशमन दल हे अत्यंत सक्षम आणि स्तुत्य अशी नागरी रक्षण सेवा पुरवित आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या अग्निशमन ध्वजसंचलनाचा प्रारंभ करणे हा एक अभिमानाचा क्षण असून, या ध्वजसंचलनातून मुंबईकरांमध्ये आग प्रतिबंधाविषयी प्रबोधन होईल, असा विश्वास महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केला.
अग्निशमन दलाच्या वतीने आयोजित अग्निशमन ध्वजसंचलनाचा प्रारंभ मुख्यालयाच्या प्रांगणात रविवारी सकाळी करण्यात आला.
दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस देशभरात अग्निशमन सेवा दिन तर १४ ते २० एप्रिल या कालावधीत मुंबईत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करून अग्निशमनाविषयी लोकशिक्षण आणि प्रबोधनही करण्यात
येते. (प्रतिनिधी)