आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्रचे उद्या प्रकाशन

By admin | Published: February 19, 2016 05:15 PM2016-02-19T17:15:04+5:302016-02-19T17:15:04+5:30

लोकमत माध्यम समुहातर्फे आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या हस्ते उद्या होणार आहे

The publication of tomorrow's iconic magazine Maharashtra | आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्रचे उद्या प्रकाशन

आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्रचे उद्या प्रकाशन

Next
>स्मृती इराणी, विनोद तावडे यांची सन्माननीय उपस्थिती, शिक्षण समर्पितांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
 
पुणे, दि. 19 - महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा लोकमत माध्यम समुहातर्फे आयोजित व अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी प्रस्तुत आयकॉन्स  ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या हस्ते दिनांक 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे व अजिंक्य डी. वाय पाटील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. 
लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष व खासदार विजय दर्डा व लोकमतचे एडीटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 
भविष्याचा वेध घेणा-या समर्पित शिक्षण सुधारकांचा या निमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून राज्यभरातील नामांकीत विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणसंस्था चालक,  शिक्षणतज्ज्ञ, विविध शैक्षणिक संघटनांचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
हा कार्यक्रम दोन सत्रंमध्ये होणार असून सकाळच्या सत्रमध्ये शिक्षणसंवाद या कार्यक्रमांतर्गत विनोद तावडे हे शिक्षण क्षेत्रतील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रमध्ये स्मृती इराणी यांच्या उपस्थिती व मान्यवरांच्या सहभागात या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे. 
महाराष्ट्रातील सुमारे 80 शिक्षण संस्थांच्या वाटचालीचा वेध आणि त्यांचे शिक्षणक्षेत्रच्या प्रगतीतील योगदान या पुस्तकातून अधोरेखीत करण्यात आले आहे. त्यामध्ये शून्यातून विश्व उभे केलेल्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. शिक्षणाच्या क्षेत्रत नाविन्यपूर्ण प्रयोग करीत राज्यातील शिक्षण विकासाला ख-या अर्थाने गती देण्याचे काम करणा-या व्यक्ती व संस्थांचा समावेश आयकॉन्स  ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या पुस्तकात केलेला आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रमध्ये व देशपातळीवरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत असून त्याचा थेट संबंध शिक्षणाशी व त्यातील गुणवत्तेशी आहे. तरुणांचा देश म्हणून स्वत:ची ओळख मिळवत असलेल्या भारतापुढे या तरुणाईतून कुशल मनुष्यबळ घडवण्याचे खरे आव्हान आहे. त्या पाश्र्वभूमीवर राज्याशी व देशाशी संबंधित विषयांवर चर्चा  व मंथन होणार आहे. सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रसमोर असणारे विविध प्रश्न या निमित्ताने एकत्रितपणो चर्चेला येणार आहेत तसेच राज्याशी संबंधित असणा:या परंतु राष्ट्रीय स्तरावरच्या विविध प्रश्नांचा उहापोहही यानिमित्ताने होणार आहे. देश एका वेगळ्य़ा स्थित्यंतराच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना शिक्षण क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे आणि तरुणाईशी थेट जोडलेले असे क्षेत्र आहे. नव्या पिढीच्या उज्‍जवल भविष्यावर देशाचे भवितव्य ठरणार आहे हे लक्षात घेत शिक्षणाच्या क्षेत्रतही लोकमतने आणखी एक विधायक पाऊल उचलले आहे.

Web Title: The publication of tomorrow's iconic magazine Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.