मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’चे प्रकाशन
By Admin | Published: August 16, 2016 01:38 AM2016-08-16T01:38:00+5:302016-08-16T01:38:00+5:30
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकेचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र
मुंबई : मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकेचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक व मासिकाचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम उपस्थित होते. कर्मचाऱ्यांची प्रतिभा, गुणांना व व्यक्तिमत्त्वाला अभिव्यक्त होण्यासाठी ‘आपलं मंत्रालय’ हे मासिक उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.