Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 06:01 PM2024-09-07T18:01:46+5:302024-09-07T18:02:44+5:30

Puja Khedkar latest Update : केंद्रीय लोक सेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द केली असून, आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Puja Khedkar discharges from Indian Administrative Service by Central government | Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Puja Khedkar Latest News : केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या कारवाईनंतर IAS पद गमावलेल्या पूजा खेडकरला आता केंद्र सरकारनेही दणका दिला आहे. केंद्र सरकारनेपूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. (Puja Khedkar discharges from Indian Administrative Service with immediate effect by Central government)

बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून नियमांचे उल्लंघन करत अनेक वेळा युपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपामुळे पूजा खेडकर वादात सापडली. पुण्यातील प्रशिक्षणार्थी काळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक आणि वडिलांकडून अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले होते. 
 
यूपीएससी पाठोपाठ केंद्र सरकारची पूजा खेडकरवर कारवाई

केंद्रीय लोक सेवा आयोगाने चौकशी करून पूजा खेडकरवर कारवाई केली. त्यानंतर केंद्रानेही मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त केले आहे. 

गाडी, ऑफिसची मागणी अन् IAS ची नोकरीच गेली

३४ वर्षीय पूजा खेडकरचे प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून महाराष्ट्रात प्रशिक्षण सुरू होते. पुणे जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण सुरू असतानाच पूजा खेडकरने कार, स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली. खासगी ऑडी ती वापरात होती. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबरही तिने बळकावले. तिच्या वडिलांनी तहसीलदाराला धमकीच्या भाषेत सुनावले. त्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सचिवांकडे तक्रार केली होती. 

पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवल्याचे आरोप झाले. त्याचबरोबर नाव बदलून अनेक वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादम प्रशासनाने त्यांचे प्रशिक्षण थांबवत हजर होण्याचे आदेश दिले. पण, पूजा खेडकर हजर झालीच नाही. 

यूपीएससीने उमेदवारी केली रद्द

दरम्यान, पूजा खेडकरने नियम डावलून, नाव बदलून अनेक वेळा परीक्षा दिल्याची यूपीएससीने चौकशी केली. यात ती दोषी ठरली. नियमांची पायमल्ली केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवत यूपीएससीने तिची प्रशिक्षणार्थी IAS नियुक्ती रद्द केली. आणि कायम स्वरुपी यूपीएससी परीक्षा देण्यावर बंदी घातली. 

Web Title: Puja Khedkar discharges from Indian Administrative Service by Central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.