नैसर्गिक ओलाव्यावर कडधान्य शेती
By admin | Published: March 3, 2017 03:01 AM2017-03-03T03:01:19+5:302017-03-03T03:01:19+5:30
कर्जत तालुक्यात पावसाळ्याशिवाय अन्य हंगामात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची शेती केली जाते.
नेरळ : कर्जत तालुक्यात पावसाळ्याशिवाय अन्य हंगामात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची शेती केली जाते. नेरळजवळील कोल्हारे येथील शेतकरी कुटुंबाने कडधान्य शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी निवडलेला वेगळा पर्याय शेतीत नफा मिळवून देणारा ठरला आहे. दरम्यान, दत्तात्रय पाटील त्यांनी सुरू केलेली शेती ही जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यावर केली जात आहे, हे विशेष.
कोल्हारे गावाचे पोलीस पाटील असलेले दत्तात्रय शंकर पाटील यांची नेरळ-कशेळे रस्त्याच्या कडेला शेती आहे. भाजीपाला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या पाटील यांनी आपल्या तीन एकर शेतीची योग्य प्रकारे मशागत करून घेतली आणि त्यावेळी त्यांना आपल्या जमिनीत पावसाळ्याशिवाय इतर काळात कोणत्या प्रकारची शेती करायची याचा अभ्यास केला. त्यावेळी पाटील यांना शेतीतील जमिनीत पावसाळ्यानंतर देखील प्रचंड ओलावा असल्याचे लक्षात आले. अनेक शेतकऱ्यांशी बोलून दत्तात्रय पाटील यांनी आपल्या शेतात पावसाळा संपताच तूर, हरभरा, मूग, वाल यांची शेती करण्यासाठी सर्व कडधान्य टाकले. तीन एकर जमिनीत आठ किलो वाल, तर चार किलो तूर, तर प्रत्येकी दोन किलो मूग आणि हरभरा यांची बियाणे शेतीत वेगवेगळ्या भागात पसरवली. जमिनीत असलेला नैसर्गिक ओलावा एवढा प्रचंड असल्याने दत्तात्रय शंकर पाटील यांच्यात शेतात कडधान्य पीक बहरले होते.
जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यामुळे पाटील कुटुंबाने मागील वर्षी तब्बल १५० किलो वाल तसेच २०० किलो तूर पिकवली होती. त्याचवेळी हरभरा आणि मूग यांची देखील ६०-७० किलो विक्र ी पाटील कुटुंबाने केली आहे. त्यासाठी त्यांना वेगळी बाजारपेठ देखील शोधावी लागली नाही. कारण आपले शेत ज्या कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर आहे तेथे त्यांनी फळ विक्री सुरू केली आहे आणि त्याच ठिकाणी पाटील कुटुंब कडधान्य याची विक्री होत असते. यावर्षी देखील गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात कडधान्य विक्रीसाठी ठेवण्यास सुरु वात केली असून सध्या हरभरा, मूग यांची विक्र ी सुरू असून ही दोन्ही कडधान्य पूर्णपणे गावठी म्हणजे स्थानिक असल्याने त्याच्या विक्र ीस मोठा ग्राहक मिळत असल्याचे दत्तात्रय पाटील यांच्या पत्नी मंजुळा यांचे म्हणणे आहे. तर गावठी स्वरूपाचा वाल मोठ्या प्रमाणात पाटील यांच्या शेतात बहरला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात विशिष्ट प्रकारचा सुगंध पसरला आहे. त्याचवेळी तूर शेती देखील फुलली असून मोठ्या प्रमाणात पिवळ्या फुलांची दुलई त्या शेतात दिसून येत आहे. यासर्व शेतीसाठी जमिनीची उखळण आणि त्यात कडधान्य पीक घेण्यासाठी टाकलेले बियाणे याशिवाय इतर कोणताही खर्च त्यांच्या शेतात पीक घेण्यासाठी करावा लागला नाही. पूर्णपणे जमिनीतील नैसर्गिक ओलाव्याचा फायदा घेऊन केलेली शेती कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. (वार्ताहर)
>तब्बल दीड एकर जमिनीत तूर पिकविण्यासाठी शेती केली असून गतवर्षीपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याचा विश्वास आहे. हे सर्व कडधान्य विकण्यासाठी कोणतीही वेगळी बाजारपेठ मिळविण्याची आम्हाला गरज नाही. कारण फळ विक्र ी करण्यासाठी उघडलेल्या दुकानात सर्व कडधान्ये विकली जातात आणि विक्र ीसाठी वेगळे कष्ट न घेता उत्पन्न अधिक मिळत आहे.
-दत्तात्रय पाटील,
शेतकरी, कोल्हारे
जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यामुळे पाटील कुटुंबाने मागील वर्षी तब्बल १५० किलो वाल तसेच २०० किलो तूर पिकवली होती. त्याचवेळी हरभरा आणि मूग यांची देखील ६०-७० किलो विक्र ी पाटील कुटुंबाने केली आहे.
यावर्षी देखील गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात कडधान्य
विक्र ीसाठी ठेवण्यास सुरु वात केली असून सध्या हरभरा, मूग यांची विक्र ी सुरू असून ही दोन्ही कडधान्य पूर्णपणे गावठी म्हणजे स्थानिक असल्याने त्याच्या
विक्र ीस मोठा ग्राहक मिळत आहे. या सर्व शेतीसाठी जमिनीची उखळण आणि त्यात कडधान्य पीक घेण्यासाठी टाकलेले बियाणे याशिवाय इतर कोणताही खर्च
के ला नसल्याची माहिती दत्तात्रय पाटील यांनी दिली.