Raj Thackeray: 'लाव रे तो व्हिडीओ'मधून पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 11:44 AM2020-02-14T11:44:50+5:302020-02-14T12:24:57+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज यांनी पुलवामा हल्ल्यावरुन मोदींना थेट लक्ष्य केलं होतं
औरंगाबाद: पुलवामा हल्ला घडला की घडवण्यात आला, असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वारंवार उपस्थित केला. मात्र या हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना राज ठाकरेंनी 'जे शहीद झालं, त्यांचं दुर्दैव' म्हणत फारसं भाष्य करणं टाळलं. हल्ल्यात जायचे ते लोक गेले. नवं सरकार स्थापन झालं, असं राज ठाकरे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले.
पुलवामा हल्ल्याला आज वर्ष पूर्ण होत आहे. त्यावेळी तुम्ही या हल्ल्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या हल्ल्याबद्दल आज काय वाटतं?, असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचं दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,' असं राज ठाकरे म्हणाले. 'मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,' अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं.
"सरकारच्या निर्णयावर टीका केली तर भाजपविरोधी, स्तुती केली तर भाजप समर्थक, मध्य भूमिका म्हणून काही आहे कि नाही?" - @RajThackerayhttps://t.co/5VjhxwbZ5R
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 11, 2020
पुलवामा हल्ल्याबद्दल काय म्हणाले होते राज?
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बॉम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या मृत्यूबाबतही त्यांनी थेट शंका उपस्थित केली होती. कुठलंही लष्कर हे माहितीच्या आधारावर कारवाई करतं. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बॉम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत, असं राज यांनी म्हटलं होतं.
दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या-
पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल
Pulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं!
आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य