पुण्यातून झाले २१९ सी़ ए.
By admin | Published: January 18, 2017 01:25 AM2017-01-18T01:25:00+5:302017-01-18T01:25:00+5:30
दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंन्टट परीक्षेत पुण्यातील २१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंन्टट परीक्षेत पुण्यातील २१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
चार्टर्ड अकाउंन्टट अंतिम परीक्षेच्या पहिल्या ग्रुपसाठी ३७ हजार २०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील २ हजार ६५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पहिल्या ग्रुपचा निकाल ७.१४ टक्के लागला आहे. दुसऱ्या ग्रुपसाठी प्रविष्ट झालेल्या ३६ हजार ८९६ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ५४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या ग्रुपचा निकाल १२.३२ टक्के लागला आहे. तर दोन्ही ग्रुपमधून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४२५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
डिसेंबर २०१६ मध्ये देशभरात २३६ केंद्रांवर घेण्यात आलेल्या कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट (सीपीटी) परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. या परीक्षेस ४१ हजार ८७७ मुले प्रविष्ट झाली होती.
पुण्यातील २१९ विद्यार्थी अंतिम सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाले असूने हे विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या किंवा दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाले असावेत. पुण्यातील ९ केंद्रांवर अंतिम परीक्षा घेण्यात आली होती, असे चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे सचिव अभिषेक धामणे यांनी सांगितले.