पुण्यात पुर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
By admin | Published: June 25, 2016 03:22 PM2016-06-25T15:22:20+5:302016-06-25T15:22:20+5:30
पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 25 - पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. धारदार हत्याराने वार करत बेसबॉल स्टीकने मारहाण करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला. शुक्रवारी हडपसर येथील लोखंडी पुलाशेजारील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
राहुल सावंत (वय 25, रा. हडपसर) असं जखमीचे नाव आहे. याप्रकरणी चेड्या ऊर्फ गणेश सुभाष चेडे (वय 22, रा. शांतीनगर, हडपसर), सरताज रियाज शेख (वय 19, रा. जिजामाता वसाहत) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार चिम्या सिंग (वय 22), जगदीश रविंद्र सोनवणे (वय 19, रा. शांतीनगर, हडपसर), रोहित सोनकांबळे (रा. गंगानगर, फुरसुंगी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि सावंत एकाच भागात राहणारे आहेत. त्यांच्यामध्ये काही दिवसांपुर्वी भांडणं झालं होतं.
राहुल सावंत शुक्रवारी संध्याकाळी भाचा नवनाथ सखाराम शिंदे आणि मित्रासह डवरीनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ गप्पा मारत उभे होते. अचानक पाठीमागून आलेल्या आरोपींनी सावंतला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. बेसबॉलच्या स्टीकने मारहाण करीत डोक्यामध्ये कोयत्याने वार करण्यात आले. तसेच नवनाथ याच्याही हातावर वार करुन आरोपी पसार झाले. पोलिसांनी चेड्या आणि सरताजला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.