Kasba Chinchwad Assembly Bypoll Results Live: चिंचवडमध्ये भाजप १०,००० मतांनी आघाडीवर
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:45 AM2023-03-02T07:45:53+5:302023-03-02T14:28:27+5:30
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.
पुणे - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण होत आली आहे. याठिकाणी कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप आघाडीवर असून याठिकाणी विजयाची औपचारिकता बाकी आहे.
LIVE
02:47 PM
आमदार रवींद्र धंगेकरांना दिलं विजयाचं प्रमाणपत्र
कसबा पोटनिवडणुकीतील नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले #RavindraDhangekar#kasbapethpic.twitter.com/vDzgCRFr75
— Lokmat (@lokmat) March 2, 2023
02:26 PM
अश्विनी जगताप यांनी घेतली १० हजारांची आघाडी
चिंचवड पोटनिवडणुकीत २१ व्या फेरीनंतर भाजपाच्या अश्विनी जगताप यांना ७४,४०२ मते, नाना काटे यांना ६४,१५१ मते तर राहुल कलाटे यांना २७,२०० मते मिळाली असून या निवडणुकीत बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीला बसताना दिसत आहे. जगताप यांची १० हजार मतांची आघाडी कायम आहे.
12:07 PM
कसब्यात काँग्रेस उमेदवाराचा दणदणीत विजय
कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. याठिकाणी भाजपाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकरांना ७२,५९९ मते मिळाली तर भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना ६१,७७१ मते मिळाली
11:56 AM
१८ व्या फेरीनंतर धंगेकर यांची ९ हजार मतांची आघाडी
कसब्यात १८ व्या फेरीची मतमोजणी पूर्ण, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असून ते ९ हजार ४९ मतांनी ते आघाडीवर आहेत. तर आता केवळ २ फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. धंगेकर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असून काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.
11:50 AM
निवडणुकीचा निकाल धक्कादायक - भाजपा उमेदवार हेमंत रासने
कसबा मतदारसंघात दरवेळी तिरंगी लढत व्हायची यंदा पहिल्यांदाच दोन जणांमध्ये थेट लढत झाली. मतदारांपर्यंत पोहचण्यात मी अपयशी ठरलो. मला या निवडणुकीच्या निकालाचं आत्मचिंतन करून कुठे कमी पडलो हे पाहावे लागेल. कुठलीही निवडणूक नेते गांभीर्याने घेत असतात. निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे, जिथे आम्ही कमी पडलो तिथे काम करू अशी प्रतिक्रिया भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी दिली.
11:31 AM
कसब्यात रवींद्र धंगेकरांची ६ हजार मतांनी आघाडी
कसबा निवडणुकीत आतापर्यंत १५ फेऱ्या पार पडल्या असून रवींद्र धंगेकर यांना ५६ हजार ४९७ मते तर भाजपाचे हेमंत रासने यांना ५० हजार ४९० मते मिळाली आहेत. रवींद्र धंगेकर सातत्याने आघाडीवर असून या मतदारसंघात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
11:16 AM
चिंचवडमध्ये बंडखोरीचा राष्ट्रवादीला बसला फटका
चिंचवड पोटनिवडणुकीत १० व्या फेरीनंतर भाजपाच्या अश्विनी जगताप यांना ३५ हजार ९३७, नाना काटे २८ हजार ५११ तर राहूल कलाटेंना ११ हजार ४२९ मते मिळाली. चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना बसल्याचे दिसत आहे.
11:11 AM
तेराव्या फेरीनंतरही रवींद्र धंगेकर यांचे मताधिक्य वाढले
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. तेराव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांना ४८,९८६ तर भाजपाचे हेमंत रासने यांना ४४,१६५ मते मिळाली. या फेरीनंतर रवींद्र धंगेकरांची आघाडी वाढली आहे.
10:58 AM
कसब्यात रवींद्र धंगेकर ५ हजार मतांनी आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीत १२ व्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ५ हजार २०० मतांनी आघाडीवर आहेत.
10:56 AM
कसब्यात ११ व्या फेरीची मतमोजणी पूर्ण, धंगेकर आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीत अकराव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ४१,२११ मते तर भाजपाचे हेमंत रासने यांना ३७,९४१ मते मिळाली आहेत.
10:48 AM
१० व्या फेरीनंतर रवींद्र धंगेकरांची आघाडी कायम
कसब्यात नवव्या फेरीनंतर धंगेकरांनी मोठी आघाडी घेतली. नवव्या फेरीत धंगेकरांनी ४ हजार ७०० मतांची आघाडी घेतली होती. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. तिथे पहिल्या फेरीपासून रविंद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराची आघाडी कायम, काय आहे सध्याची स्थिती? वाचा https://t.co/mN0OCGxPCh
— Lokmat (@lokmat) March 2, 2023
10:46 AM
चिंचवडमध्ये ९ व्या फेरीनंतरही भाजपाची आघाडी कायम
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम, नवव्या फेरीत अश्विनी जगताप यांना ३६०२, नाना काटे - २७६५, राहुल कलाटे यांना १०५२ मते मिळाली. एकूण मतमोजणीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांना ४ हजार ९२९ मतांची आघाडी मिळाली आहे.
10:34 AM
कसब्यात भाजपाचा गड कोसळणार, संजय राऊतांचा दावा
महाविकास आघाडी किती मजबुतीने पुढे जातेय त्याचे कसबा हे ज्वलंत उदाहरण आहे. कसबा भाजपाचा गड होता. त्याठिकाणी शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपा नेहमी जिंकून आली. परंतु आता शिवसेना महाविकास आघाडीचा घटक आहे. त्याचे परिणाम या निकालात पाहायला मिळत आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
10:19 AM
आठव्या फेरीनंतर धंगेकर ३,५०० मतांनी आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीत पुन्हा चित्र पालटलं, आठव्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पुन्हा आघाडीवर गेले आहेत. धंगेकर आतापर्यंत ३०,५२७ मते तर भाजपा उमेदवार हेमंत रासने यांना २७,१८७ मते मिळाली आहेत. आठव्या फेरीनंतर ३,५०० मतांनी आघाडीवर आहेत.
10:07 AM
सातव्या फेरीनंतर धंगेकर १२७४ मतांनी आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीत सातव्या फेरीत हेमंत रासने यांनी धंगेकरांपेक्षा जास्त मतदान घेतले. आतापर्यंत हेमंत रासने यांना २४६२३, तर रवींद्र धंगेकर २५,८९७ मते मिळाली आहेत. सध्या धंगेकर १२७४ मतांनी आघाडीवर आहेत.
10:04 AM
चिंचवडमध्ये भाजपाची आघाडी कायम, मविआ पिछाडीवर
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सहा फेरीनंतर जगताप ३ हजारांहून जास्त मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी जगताप यांना २०,५२९, नाना काटे १७२१० तर राहुल कलाटे ७१४७ मते मिळाली आहेत.
10:01 AM
कसब्यात मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांचा बंदोबस्त
कसबा पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या फेरीपासून रवींद्र धंगेकर आघाडीवर असून आता मतमोजणी केंद्राजवळ कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे. याठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी केंद्राजवळ कार्यकर्ते जमा होऊ लागले. पोलिसांचा चोख बंदोबस्त #kasbabypollelectionpic.twitter.com/GMVhdywOkH
— Lokmat (@lokmat) March 2, 2023
09:45 AM
पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांची आघाडी कायम
कसबा पोटनिवडणुकीत पाचव्या फेरीअखेर ३ हजार मतांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीत धंगेकर ४१३१ तर रासने यांना २६३९ मते मिळाली आहेत.
09:38 AM
बिगबॉस फेम अभिजीत बिचकुलेंना केवळ ४ मते
कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेले बिग बॉस फेम उमेदवार अभिजीत बिचकुले यांना पहिल्या फेरीत ४ मते मिळाली.
09:36 AM
चौथ्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीत चौथ्या फेरी अखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना १४,८९९ मते मिळाली असून भाजपाचे हेमंत रासने यांना १४,३८२ मते मिळाली आहेत. अद्यापही धंगेकर आघाडीवर आहेत.
09:17 AM
कसब्यात दुसऱ्या फेरीत धंगेकरांची आघाडी कमी झाली
कसब्यात दुसऱ्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली असून १५०० मतांचा फरक आहे. हेमंत रासने यांना ६९६४, रवींद्र धंगेकर ८,६३१ मते मिळाली आहेत.
09:03 AM
कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर, अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मतदान
कसबा पोटनिवडणूक मतदारसंघात कुंभारवाडा, शिंपी आळी, भाई वाडा, पवळे चौक, गावकोस मारुती परिसर या पूर्वेकडील भागात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे. पहिल्या फेरीत ज्या १४ मतदान केंद्रावरील मतांची मोजणी झाली तो संपूर्ण भाग काँग्रेसला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे या भागात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.
08:58 AM
चिंचवडच्या दुसऱ्या फेरीतही भाजपा आघाडीवर
चिंचवड पोटनिवडणुकीत दुसऱ्या फेरीतही भाजपाच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. ६०० मतांनी जगताप आघाडीवर असून नाना काटे दुसऱ्या नंबरवर आहेत. राहुल कलाटे यांच्यामुळे मतांमध्ये विभागणी
08:53 AM
कसब्यात पहिल्या फेरीत काँग्रेस उमेदवार आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पहिल्या फेरीत २ हजारांच्या मतांनी आघाडीवर आहेत. भाजपा उमेदवार हेमंत रासने याठिकाणी पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत.
08:41 AM
चिंचवडमध्ये पहिल्या फेरीत भाजपा आघाडीवर
चिंचवड पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीत महायुतीच्या अश्विनी जगताप यांना ४०५३, महाविकास आघाडीच्या नाना काटे ३६०५, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे १२७३ मते मिळाली आहे.
08:37 AM
चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप आघाडीवर
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. पोस्टल मतमोजणीनंतर आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली असून चिंचवडमधून पहिला कल हाती आला आहे. भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी ३४९ मतांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे.
Pune, Maharashtra | Counting of votes underway for Kasba Peth by-elections pic.twitter.com/CUp88aRSL3
— ANI (@ANI) March 2, 2023
08:29 AM
कसब्यातील पोस्टल मतमोजणीत रवींद्र धंगेकर आघाडीवर
कसबा पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतदानाला सुरुवात झाली असून यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
08:27 AM
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त
कसबा पोटनिवडणुकीसाठी भारतीय खाद्य निगमच्या कोरेगाव पार्क येथील गोदामात पोलिस बंदोबस्तात मतमोजणी सुरू. १०० मीटर अलीकडेच रस्ते बंद, वाहनांना मनाई
08:14 AM
निवडणूक निकालापूर्वीच विजयाचे दावे-प्रतिदावे
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपा आणि महाविकास आघाडीने विजयाचे व अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहेत. शहरात फ्लेक्सवॉर सुरू झाले आहे. विजयाचे दावे आणि प्रतिदावे सुरू झाले आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असले तरी निकालाची उत्सुकता लागली आहे. विविध वाहिन्या, सोशल मीडियावर विजयाचे दावे केले आहेत. महायुती कार्यकर्त्यांनी पंचवीस ते चाळीस हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीने पंधरा हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा केला. त्यासोबतच अपक्षाच्या समर्थकांनी आम्हीच जायंट किलर होणार असल्याचा दावा केला आहे.
08:13 AM
चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीत अश्विनी जगताप पुढे
चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यात सध्या अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं सांगितले जात आहे.
08:04 AM
मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीला १५-२० मिनिटे लागणार
या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या एका फेरीसाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.