पुणे शहर जगात १४४ व्या स्थानी
By admin | Published: February 24, 2016 02:36 AM2016-02-24T02:36:27+5:302016-02-24T02:36:27+5:30
राहणीमानाच्या आणि सेवासुविधांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना सर्वोत्तम शहर असल्याचे आढळून आले आहे.
लंडन : राहणीमानाच्या आणि सेवासुविधांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना सर्वोत्तम शहर असल्याचे आढळून आले आहे. या यादीत पहिल्या १०० शहरांत भारतातील एकाही शहराचा समावेश नाही, मात्र हैदराबाद १३९ व्या, पुणे १४४, बंगळुरु १४५, चेन्नई १५०, मुंबई १५२, कोलकाता १६० आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली १६१ व्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे.
या यादीत पहिल्या १०० शहरात भारतातील एकाही शहराचा समावेश नाही हे येथे उल्लेखनीय आहे. हे अशा प्रकारचे १८ वे सर्वेक्षण आहे. त्यातच १८ लाख लोकसंख्या असलेले व्हिएन्ना हे शहर प्रथम क्रमांकावर आढळून आले आहे. व्हिएन्नानंतर ज्युरिच, आॅकलंड, म्युनिक आणि व्हन्कूअर यांचा क्रमांक लागतो. या सर्वेक्षणात जगभरातील २३० शहरांचा सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क या शहरांनाही पहिल्या ३० जणांच्या यादीत स्थान मिळू शकले नाही.